महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र…
मुंबई- महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला विभागवार किती जागा मिळाल्या होत्या. हा भूतकाळ लक्षात घ्यायला हवा.
विधानसभेचे २८८ आमदार निवडून आणण्यासाठी तब्बल ८ कोटी २५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजकीय पक्षांना प्रचारासाठी केवळ २२ दिवसच मिळणार असल्यानं नेत्यांची चांगलीच धावपळ होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा (नकाधिकार) वापर केला जाणार आहे. तसेच मतदारांना घरपोच वोटिंग आयडी स्लीप पुरवली जाणार आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८२ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६२, शिवसेनेला ४४ जागा तर भाजपला ४६ जागांवर विजय मिळाला होता. प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसेने १३ जागा पटकावल्या होत्या. अपक्षांनी २४ तर इतरांनी १७ जागा मिळाल्या होत्या.
कोकण विभागात एकूण १५ जागा
>शिवसेना ४ , भाजप १, काँग्रेस २,राष्ट्रवादी ५, अपक्ष ० , मनसे ०, इतर ३
मुंबई विभागात एकूण ३६ जागा
>काँग्रेस १७ ,राष्ट्रवादी ३,शिवसेनेला ४, भाजप ५, अपक्ष ० , मनसे ६ , इतर १
ठाणे विभागात एकूण २४ जागा
>शिवसेनेला ५, भाजप ४, काँग्रेस १,राष्ट्रवादी ५,मनसे २, अपक्ष २ , इतर ५
उत्तर महाराष्ट्र विभागात एकूण ३५ जागा
>काँग्रेस ६,राष्ट्रवादी ९,शिवसेना ७, भाजप ४ , मनसे ३, अपक्ष ३ , इतर ३
विदर्भ विभागात ६२ जागा
>काँग्रेस २४ ,राष्ट्रवादी ४ ,शिवसेना ८, भाजप १९, मनसे ०, अपक्ष ६ , इतर
मराठवाडा विभागात एकूण ४६ जागा
>काँग्रेस १८,राष्ट्रवादी १२, शिवसेना ७, भाजप २,मनसे १, अपक्ष ५ , अन्य १
पश्चिम महाराष्ट्र विभागात ७० जागा
>काँग्रेस १४, राष्ट्रवादी २४, शिवसेना ९, भाजप ११, मनसे १, अपक्ष ८ , इतर ३
कोकण विभाग
>काँग्रेस २ जागा (४,७०,९६९ मते, २०.९२ %), शिवसेना ४ जागा (५,२३,१०९ मते २३.२४%), भाजप १ जागा (१,२३,६२० मते, ५.४९%), राष्ट्रवादी ५ जागा (४,२७,७८२ मते, १९%), मनसे ० जागा (६९,२२४ मते, ३.८%) अपक्ष -(२,४०,७०३ मते, १०.६९%) अन्य ३ जागा (६,३६,३२४ मते, २८.३%)
मुंबई विभाग
>काँग्रेस १७ जागा (१२,९१,१३५ मते, २८.२८%), शिवसेना ४ जागा (८,८८,११२ मते, १९.४६%), भाजप ५ जागा (५,४५,४२८ मते, ११.९५%), राष्ट्रवादी ३ जागा (२,९२,९१६ मते, ६.४२%), मनसे ६ जागा (१०,८४,२३४ मते, २३.७५%) अपक्ष (१,६७,०८९ मते,३.६६%) अन्य १ जागा (४५,६४,८४९ मते, १०.१४ %)
ठाणे विभाग
काँग्रेस १ जागा (२,८७,४५३ मते, ८.६४%), शिवसेनेला ५ जागा ( ६,९४,४११ मते, २०.८६%), भाजप ४ जागा ( ३,२४,३०६ मते, ९.७४%), राष्ट्रवादी ५ जागा ( ५,२८,१६२ मते, १५.८७%), मनसे २ जागा (४,८१,६१६ मते, १४.४७%)अपक्ष २ जागा (५,१४,०१९ मते, १५.४४ %) अन्य ५ जागा (३,६९,०११ मते, ११.०९ %)
उत्तर महाराष्ट्र
>काँग्रेस ६ जागा (८,१५,५१६ मते, १५.१२%), शिवसेनेला ७ जागा (११,१०,१४० मते, २०.५८%), भाजप ४ जागा (७,२३,६८६ मते, १३.४१%) राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागा (१२,०४,७८७ मते, २२.३३%), मनसे ३ जागा (२,८१९४५ मते,५.२३%), अपक्ष ३ जागा (७,१९,५२० मते, १३.३४ %) अन्य ३ जागा (५,३९,८६८ मते, ९.९९ %)
विदर्भ विभाग
>काँग्रेस २४ जागा ( २७,६२,७०१ मते, २८%) शिवसेनेला ८ जागा ( १०,८१,८३० मते,१०.९६%), भाजप १९ जागा (२२,६६,३३२ मते, २२.९७%) राष्ट्रवादी ४ जागा ( ७,२२,६३८ मते, ७.३२%), मनसे (१,०१,३०९ मते, १.३%) अपक्ष ६ जागा (१६,०३,१६५ मते,१६.२५%) अन्य १ जागा (१४,२९,९६१ मते, २.९६%)
मराठवाडा विभाग
>काँग्रेस १८ (१७,५७,५९८ मते, २२.५०%) शिवसेनेला ७ (१३,४८,४८७ मते, १७.२६%) भाजप २ (११,५८,९५० मते, १४.८३%) राष्ट्रवादी १२ (१४,९३,७४० मते, १९.१२%) मनसे १ जागा (१,९१,१६८ मते,२.४५%), अपक्ष ५ जागा (११,१९,१२१ मते, १४.३२%) अन्य १ जागा (७,४४,११६ मते, ९.५२%)
पश्चिम महाराष्ट्र विभाग
काँग्रेस १४ जागा (११,३६,३३१मते, १७.६६%), शिवसेनेला ९ जागा (१७,२२,९४० मते, १४.२४%), भाजप ११ जागा (९,५५,०३७ मते, ७.६५%), राष्ट्रवादी २४ जागा (२७,५०,१८८ मते, २२.७४%) मनसे १ जागा (३,७६,००२ मते, ३.११%) अपक्ष ८ जागा (२२,६६,५६५ मते, ८.७४%) अन्य ३ जागा (७,३३,२१९ मते, ६.६ %)
एक नजर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ४८ जांगापैकी शिवसेनेला १८ जागा मिळाल्या शिवसेनेला १,००,५१,०९० इतकी मते मिळवत २०.६ टक्के मते मिळवली. भाजपला लोकसभेच्या २३ जागा मिळाल्या या निवडणुकीत भाजपला १,३३,०८,९६१ इतकी मते मिळाली. भाजपला एकूण २७.३ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या या निवडणुकीत काँग्रेसला ८८,३०,१०२ इतकी मते मिळाली त्यांना एकूण १८.१ टक्के मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा मिळवल्या त्यांना ७७,८२,२७५ इतकी मते मिळाली, राष्ट्रवादीला एकूण १६ टक्के मते मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघाटनेला १ जागा मिळाली त्यांना एकूण ११,०५०७३ मते मिळाली. स्वाभिमान शेतकरी संघटनेला २.३ टक्के. मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. मात्र मनसेला ७,०८,११८ इतकी मते मिळाली. १.५ टक्के मते मनसेने मिळवली होती.
Aricelts like this are an example of quick, helpful answers.