आशिया खंडातील नावाजलेल्या तिहार तुरुंगात सीमकार्ड, ब्लेडस् सापडल्याने खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली- आशिया खंडातील नावाजलेल्या तिहार तुरुंगात सीमकार्ड, ब्लेडस् सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तिहार तुरुंगाच्या भिंतींची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिहार तुरुंगातील उच्चाधिका-याने सांगितले की, तुरुंगातील एक, आठ आणि नऊ क्रमांकाच्या बराकीत अनेक आक्षेपार्ह बाबी सापडल्या आहेत. टेनिस बॉल, सॉक्स, सीमकार्ड, सेलफोन, तंबाखू, ब्लेडस् सापडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तिहार तुरुंगाच्या भिंती ४ ते ५ फुटांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांशी याबाबत चर्चा सुरू आहे.
या विविध वस्तूंमुळे तुरुंगातील शांतता भंग होत आहे. तुरुंगाच्या भिंती वाढवूनही आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास जाळ्या लावण्यात येतील. तसेच भिंतीच्या उंची वाढवण्याच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम वरिष्ठ पोलिस अधिका-यांना दिले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे, असेही तुरुंगाधिका-यांनी सांगितले.
या आक्षेपार्ह वस्तू तुरुंगाच्या प्रवेशद्वारावरून नेणे अशक्य आहे. कारण या तुरुंगात प्रवेश करताना अनेक सुरक्षा कसोटींना पार करावे लागते.
फिल्म शोल्ये में गब्बर ने सही कहा था ! कि ” दुनियाके किसी भी जेल कि दिवार इतनी पक्की नाही,जो गब्बर को बीस साल तक
रोक सके ,”!!