‘तुम्हाला साडे तीन कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मात्र, ते पैसे मिळण्यासाठी ११.३० लाख रुपयांचे सीमा शुल्क आणि सेवा कर भरावा लागेल, असा एसएमएस इंग्लंडचा राजदूत असल्याचे सांगून एका ठकसेनाने धारावीतील व्यावसायिक पोलारसी शेखर नाडर यांना पाठवला.
मुंबई- ‘तुम्हाला साडे तीन कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मात्र, ते पैसे मिळण्यासाठी ११.३० लाख रुपयांचे सीमा शुल्क आणि सेवा कर भरावा लागेल, असा एसएमएस इंग्लंडचा राजदूत असल्याचे सांगून एका ठकसेनाने धारावीतील व्यावसायिक पोलारसी शेखर नाडर यांना पाठवला. मात्र, पैसे भरूनही लॉटरीचे पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे नाडर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
तक्रारदार पोलारसी शेखर नाडर हे धारावीतील शास्त्री नगर येथे राहतात. २७ जानेवारीला त्यांच्या मोबाइलवर एक एसएमएस आला होता. त्यात संदेश पाठवणा-या व्यक्तीने स्वत:चे नाव डेविड मॉर्गन असून आपण इंग्लंडचे राजदूत असल्याचे नमूद केले होते. तसेच इंग्लंडच्या या कथित राजदुताने एका खासगी मोटरकार कंपनीच्या लॉटरीत नाडर यांनी ३ कोटी ५० लाख रुपयेजिंकल्याची माहिती एसएमएसमध्ये नमूद केली.
ही रक्कम मिळवण्यासाठी नाडर यांच्याकडे पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र व बँक खात्याची माहिती मागितली. मोबाइलवर आलेल्या या एसएमएसवर विश्वास ठेऊन नाडर यांनी दिलेल्या इ-मेलवर संबंधित कागदपत्रांच्या प्रती पाठवल्या. त्यानंतर सव्र्हिस टॅक्सच्या नावाखाली १३ हजार रुपये एका राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात भरण्यास त्यांना सांगण्यात आले. इ-मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नाडर यांनी ही रक्कम भरली. त्यानंतर परदेशी बँकेत खाते उघडण्याच्या नावाखाली, कस्टम डय़ुटीच्या नावाखाली, परदेशी चलन रुपयांमध्ये बदलण्यासाठी अशा विविध सबबी सांगून खाजगी व राष्ट्रीयीकृत बँकेत नाडर यांना पैसे भरण्यास सांगितले. तीन कोटी ५० लाख रुपये मिळण्याच्या आशेवर नाडर यांनीही २७ जानेवारी ते २७ ऑगस्टपर्यंत १३ विविध खात्यांमध्ये एकूण ११ लाख ४० हजार ६०० रुपये भरले. शेवटी या भामटय़ांनी नाडर यांना ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’ नावाच्या बँकेचे एटीएम कार्ड पाठवले. ते वापरल्यानंतर बोगस असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा सगळा बनाव असल्याचे नाडर यांच्या लक्षात आले. त्यानुसार अखेर त्यांनी या प्रकरणी स्थानिक धारावी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार धारावी पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक, बोगस कागदपत्रे तयार करणे आदी विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सध्या सायबर पोलिस करत आहेत.
प्राथमिक तपासानुसार नाडर यांच्या सोबत डेव्हिड मॉर्गन, मॅथ्युज व मॅथ्युजची पत्नी आदी विविध व्यक्तींच्या नावाने आरोपींनी इ-मेलद्वारे संभाषण केले आहे. नाडर यांनी जमा केलेल्या १३ खातेधारकांची पोलिस माहिती घेत असून त्याच्या साहाय्याने तपास सुरू आहे.
एकदम चुतीया हा Nadar निघाला ,एकदम लोभी माणूस आहे हा घटिया Nadar ,आजकाल laptop आणि कॉम्पुटरवर असे
कित्तेक मेसेजेस येत असतात,हे ह्या घाटबाला माहित नाही काय ????