सुप्रसिद्ध तालवादक उस्ताद तौफिक कुरेशी हे भारतीय विद्याभवनाच्या संगीत आणि नृत्य शिक्षापीठात विद्यार्थ्यांना जेम्बे या वाद्याचे शिक्षण देणार आहेत.
मुंबई – सुप्रसिद्ध तालवादक उस्ताद तौफिक कुरेशी हे भारतीय विद्याभवनाच्या संगीत आणि नृत्य शिक्षापीठात विद्यार्थ्यांना जेम्बे या वाद्याचे शिक्षण देणार आहेत.जेम्बे हे आफ्रिकेतील प्रसिद्ध वाद्य आहे.
कुरेशी हे प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे धाकटे बंधू असून, त्यांनी आपले वडील आणि प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्लाह रखा यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत भारतीय विद्याभवनाच्या संगीत आणि शिक्षापीठात संगीताचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.
भारतीय विद्यापीठाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त आणि विद्याभवनाचे संस्थापक कुलपती डॉ. के. एम. मुन्शी यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त घेण्यात येणा-या विशेष उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
i would like to know about this workshop