Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमध्यंतरवास्तू वेधख्रिसमसची रंगबिरंगी सजावट

ख्रिसमसची रंगबिरंगी सजावट

चार दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ती बांधवांसाठी दिवाळीच जणू! आपल्या दिवाळीसारखीच त्यांचीदेखील जय्यत तयारी सुरू असते. घराई साफसफाई, घराची सजावट अशा सगळ्याच गोष्टी सुरू असतात. कंदील, माळा आणि झिरमिळ्यांबरोबरच ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, डान्सिंग बॉल्स, स्नो मॅन, बेल्स, रेड रिबिन्सने घर सजतं. तर अशा या ख्रिसमसच्या स्वागतासाठी घर सज्ज करण्यासाठी खास टिप्स.

decorations 1

परदेशाइतकं नसलं तरीही आपल्याकडे थोडयाफार प्रमाणात का होईना पण ख्रिसमस साजरा केला जातोच. मॉल्स, दुकानं तर अक्षरश: ख्रि्रसमसच्या सजावटीने लखलखत असतात. ख्रिस्ती बांधवांच्या घरी तर लगबग सुरू असते. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, डान्सिंग बॉल्स, स्नो मॅन, बेल्स, रेड रिबिन्स आदी गोष्टींनी घर सजलं असेल. या गोष्टी तर आपण दरवर्षी करतोच. पण त्याचबरोबर आपल्या घराला आणखी कशा प्रकारे सजवता येईल यासाठी काही टिप्स जाणून घेऊ या.

पुष्पगुच्छ

वर्तुळाकार आकारात असलेला पुष्पगुच्छ ख्रिसमसच्या निमित्ताने घरोघरी लावलाच जातो. कागदाच्या फुलांनी किंवा बाजारात मिळणारी प्लास्टिक किंवा ख-या फुलांनी केलेला हा पुष्पगुच्छ खिडकीवर, दरवाजावर किंवा गॅलरीत शोभून दिसेल. घरी करायला वेळ नसेल तर बाजारातही हे पुष्षगुच्छ मिळतात. त्यांना खरं म्हणजे व्रेथ असं म्हणतात.

वेगवेगळ्या आकाराचे हे गोल आणून ते एकमेकांच्या वर लावा आणि त्यावर बेल्स किंवा रिबीन लावून दरवाजा किंवा खिडकीत लावा. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं दिसेल. तसंच तुम्ही हे मेणबत्त्यांभोवतीदेखील ठेवू शकतात. केवळ जिलेटीन पेपरचे करून त्यात दिव्यांची माळा लावूनही तुम्ही छान भिंतीवर लावू शकतात.

मेणबत्त्यांचा वास

एका कॅनला भरपूर मेणबत्त्या लावून सजवा. या मेणबत्त्यांमध्ये केवळ पांढ-याच नाही तर रंगीत मेणबत्त्याही आल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही छान वास किंवा फ्लॉवरपॉट करू शकतात. या मेणबत्त्या एकमेकांना गोंदाच्या साहाय्याने चिकटवून घ्या. त्याला छानशी रेड रिबिन बांधा आणि त्यात फुलं ठेवून तो डायनिंग टेबल किंवा खिडकीच्या कोप-यात ठेवा.

डायनिंग टेबल आणि सांताच्या खुर्च्या

आपण नेहमीच डायनिंग टेबलवर टेबलक्लॉश घातलेला असतो. पण या वेळी या खास सणानिमित्त डायनिंग टेबलासोबत खुर्च्यानाही कापडाचं कव्हर करा. आणि त्यांच्या भोवती तुम्हाला आवडीच्या रंगाचा बो करून लावा. पाहा बरं तो डायनिंग कोपरा काही वेगळाच दिसतो. खुर्च्या नुसत्याच कव्हर करायच्या नसतील तर तुम्ही केवळ सांताक्लॉजच्या टोप्यांच्या आकाराच्या खुर्च्याच्या पाठीला कव्हर करून ठेवू शकतात. यामुळे या खुर्च्याना छान लूक येईल. डायनिंग टेबलच्या मधोमध ख्रिसमस ट्री ठेवल्यास ते छान दिसतं.

ख्रिसमस बॉल्स

तुम्हाला हव्या त्या अ‍ॅक्रेलिक रंगात बल्स पेंट करून त्यावर ग्लिटरने स्प्रे करा. आणि ते बल्ब कुठेही टांगा. किंवा त्यावर छान शुभेच्छा देणारे संदेश लावा. या ब्लबचे तुम्ही सांताक्लॉजदेखील करू शकता. पांढरा रंग देऊन त्यावर पेन्सिलने सांताचं चित्रं काढून घ्या आणि मग रंगवा.

कापसाचा वापर करून त्याला दाढी लावा आणि घोटीव पेपराची टोपी करा. हे सांता तुम्ही टांगू शकतात किंवा कुठेही ठेवू शकतात. किंवा या बॉल्सना नुसतंच रंगवून एका परडीत किंवा छान आकराच्या भांडयामध्ये ठेवून कॉर्नर पीस म्हणूनही ठेवू शकतात.

ख्रिसमस कॅरल्स

तुम्हाला आवडणा-या ख्रिसमस कॅरलमधलं एखादं वाक्य पेंट करून ते वॉलवर लावा. किंवा दरवाजावर लावा. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘जॉय टू द वर्ल्ड..’, ‘फा ला ला ला’ अशी गाणी छान रंगांमध्ये डिस्प्ले करून लावावीत.

हँगिंग मोजे

ख्रिसमसला सांताक्लॉज मोजांमध्ये गिफ्ट देतो असं म्हणतात. एक किंवा अनेक मोजे छान डेकोरेट करून ते जिन्यामध्ये किंवा खिडकी-दरवाजात लावा. पण नुसता मोजा लावण्यापेक्षा तो दिसेल अशा पद्धतीने डेकोरेट करा. म्हणजे पटकन तिकडे लक्ष जाईल. त्यासाठी त्यावर लाईटिंग करा. किंवा बेल्स किंवा पानं लावा. या फुलं आणि पानांच्या मध्ये डेकोरेटिव्ह बॉल्स आणि दिव्यांचा वापर करून संपूर्ण घर छान उजळून टाका. तुमच्या मुलांच्या उशाशी ठेवायला एकच छानसा मोजा सजवून त्यात गिफ्ट घालून ठेवा.

स्नो मॅन

वर म्हटल्याप्रमाणे बॉल किंवा प्लास्टिकच्या जारचादेखील तुम्ही स्नो मॅन करू शकता. काळा, पांढरा आणि केशरी रंग आणि रेड रिबिनचा वापर करून तुम्ही स्नो मॅन करू शकता. एक मोठा आणि एक लहान असे दोन बॉल एकमेकांवर ठेवून त्यांना पांढरा रंग द्या किंवा कापूस चिकटवा. रेड रिबिनच्या साहाय्याने तुम्ही हा स्नो मॅन उभारू शकतात. त्यांना एका कोप-यात बसवा आणि तो कोपरा कापसाने भरून टाका. वाटल्यास तिथे एक ट्रीदेखील लावा.

पिलोज सजवा

आजकाल बाजारात छान छान रिबिन्स आणि त्यावर लावण्यात येणारा बो मिळतो. त्याचा वापर करा आणि तुमची उशी किंवा पिलो सजवा. रिबिन त्या उशीभोवती गुंडाळा. मधोमध बो लावा. हा बो तुम्ही सॅटिन रिबिनचादेखील करू शकतात.

झाडांची वेल

जिने, खिडक्या, दरवाजे, घरातले खांब, गॅलरी अशा विविध ठिकाणी तुम्ही वेल लावावी. त्यात अधून मधून दिव्यांची माळ सोडली की त्याचा लूकच वेगळा येतो.

कार्ड डेकोरेशन

या ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक जण ग्रीटिंग्ज पाठवत असतात. तुम्ही तुम्हाला आतापर्यंत आलेली ग्रीटिंग्ज किंवा तुमच्या मुलांनी केलेली ग्रीटिंग्ज जपून ठेवली असतील तर ती तुम्ही भिंतीवर डिस्प्ले करू ठेवा. त्याच्या आजूबाजूने लायटिंग करा. ग्रीटिंग्ज कार्ड करायचे नसेल तर ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारं तोरण करून लावा आणि त्याच्या आजूबाजूला रेनडिअर, स्नो मॅन, ट्री किंवा सांताक्लॉज ठेवा.

नट्स जार

काचेचा आठ ते बारा इंचांचा एक मोठा जार घ्या. त्यात जाड खांबासारख्या मेणबत्तीला ठेवा. त्यासाठी लागणारा काचेचा होल्डर त्या जारच्या मधोमध ठेवा. आणि तुमच्या आवडीच्या फळांनी आणि नट्सनी तो जार भरून टाका. आणि हा जार पाहुणे मंडळी ज्या ठिकाणी बसतील अशा ठिकाणी म्हणजे सोफ्याच्या बाजूला किंवा टेबलावर ठेवावा.

ख्रिसमस ट्री

ख्रिसमस ट्री ही तसं पाहायला गेलं तर नेहमीचीच गोष्ट आहे. ठिकठिकाणी दुकानांत आणि घरात ख्रिसमसची ही झाडं उभारली जातात. ही झाडं उभारून ती सजवा. त्याला दिव्यांच्या माळा किंवा छोटी छोटी गिफ्ट्स, सांताक्लॉज आणि कापसाच्या साहाय्याने सजवा. बाजारात फोल्डिंगचीदेखील झाडं असतात. ती अगदी सहज उपलब्ध होतात.

सजवलेली ही झाडं घराला शोभा आणतात. लहान -मोठया हव्या त्या आकारातल्या ख्रिसमस ट्रीचा वापर करून तुम्ही तुमचं घर सजवू शकतात. त्यासाठी सोनेरी किंवा चंदेरी रंगांचाही वापर करू शकतात. ही झाडं अतिशय छान दिसतात. याशिवाय तुम्ही बॉल्सचा वापर करूनही ख्रिसमस ट्री उभारू शकतात.

गिफ्टस् बॉक्स

ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात आणि लहान मुलांना गिफ्ट्स देतात. म्हणूनच तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना गिफ्ट्स घेतली असतील तर ती छान सजवून एका कोप-यात ठेवून द्या.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट