स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतील नोकरी एक्स्प्रेस बदलापूरमध्ये दाखल झाली असून बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
बदलापूर- स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतील नोकरी एक्स्प्रेस बदलापूरमध्ये दाखल झाली असून बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. नोकरी एक्स्प्रेसच्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
बदलापूरच्या शिरगाव आपटेवाडी भागात पार पडलेल्या या मोहिमेत परिसरातील सुमारे ३०० सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना नोक-या मिळाल्या. बँकिंग, इन्शुरन्स, कॉल सेंटर, खासगी कंपन्या अशा विविध ठिकाणी या नोक-या देण्यात आल्या. यासाठी विविध कंपन्यांचे एचआर देखील बदलापुरात आले होते.
या तरुण-तरुणींना स्वाभिमानच्या रोजगार मोहिमेत मुलाखती घेऊन त्यांना तत्काळ ऑफर लेटरही देण्यात आले. ‘स्वाभिमान’चे बदलापूर शहर संघटक रवींद्र गडगे यांनी आयोजित केलेल्या रोजगार मोहिमेत स्वाभिमान संघटनेच्या रोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनय यादव प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा संघटक रोहित साळवे, अंबरनाथ शहर संघटक रेवण शिंदे, जितू पाटोळे, कौस्तुभ लोखंडे, दिनेश भोसले, संतोष खांडपेकर, प्रवीण लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोहिमेच्या नियोजनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
यावेळी ‘स्वाभिमान’च्या मोहिमेमुळे नोकरी मिळाल्याचा आनंद सुशिक्षित व होतकरू बेरोजगार तरुणांनी व्यक्त करताना स्वाभिमान संघटना व आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
शिवसेना हा एकमेव पक्ष फक्त मराठी आणि स्थानिक उमेद्वाराकरिता रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याकरिता चर्चेत होता, परंतु आता “स्वाभिमान” सारख्या संघटनेने आणि त्याचे मुख्य अध्यक्ष “श्री नितेश राणे” साहेब यांनी जे तडफदार उमेदवारांकरिता नोकरी एक्स्प्रेस चालवले आहे आणि सर्व काही येत असताना उमेदवारांस नोकऱ्या का मिळत नाही? याचा विचार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल स्थानिक उमेदवार त्यांचे शतश: आभारी राहतील. कारण हल्ली नोकरी धंद्यात हि पुष्कळ राजकारण खेळले जाते हो.