फ्रान्सच्या बँकिंग क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेल्या बीएनपी परिबाने गुरुवारी देशातील आघाडीची मुंबईस्थित ब्रोकरेज कंपनी शेअरखानमध्ये १०० टक्के हिस्सा खरेदीसाठी या कंपनीच्या भागधारकांबरोबर करार केला.
मुंबई- फ्रान्सच्या बँकिंग क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेल्या बीएनपी परिबाने गुरुवारी देशातील आघाडीची मुंबईस्थित ब्रोकरेज कंपनी शेअरखानमध्ये १०० टक्के हिस्सा खरेदीसाठी या कंपनीच्या भागधारकांबरोबर करार केला.
मात्र या व्यवहाराच्या आर्थिक बाबींबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी २००० कोटींमध्ये हा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे. यामुळे बीएनपी परिबाला भारतात व्यवसाय विस्ताराला वाव मिळणार आहे.
वैयक्तिक गुंतवणूकदार विभाग म्हणून बीएनपी परिबाशी शेअरखानशी जोडले जाईल. शेअरखानची खरेदी आमच्यासाठी वेगळी संधी ठरणार आहे. यामुळे भारतीय बाजारात संधी निर्माण करून आणखी व्यवसायवाढीला चालना मिळणार असल्याचे बीएनपी परिबा इंडियाचे कंट्री हेड जोरिस डर्क्स यांनी म्हटले आहे.
शेअरखानचे १२ लाख क्लायंट असून ही स्वतंत्र ब्रोकर संस्था आहे.
Brlialince for free; your parents must be a sweetheart and a certified genius.