भ्याड हल्लेखोराला हल्ला करण्यापूर्वी कायद्याचे भय का वाटले नाही ? समोर उभी असलेली मुलगी निशस्त्र आहे तिची कुठलीही तयारी नाही.
मुंबई – ‘इंडियास रॉ स्टार’ या रिअॅलिटी शो च्या सेटवर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका युवकाने बॉलिवूड़ अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानवर हल्ला केला होता. या घटनेबद्दल गौहरने प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी गौहर म्हणाली की, त्या भ्याड हल्लेखोराला हल्ला करण्यापूर्वी कायद्याचे भय का वाटले नाही ? समोर उभी असलेली मुलगी निशस्त्र आहे तिची कुठलीही तयारी नाही. ती आपल्यापरीने क्षमतेनुसार चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने कसा हल्ला केला ? असे सवाल गौहरने विचारले.
स्टार प्ल्सच्या ‘इंडियास रॉ स्टार’ या रिअॅलिटी शो च्या अंतिम सोहळयाचे चित्रीकरण सुरु असताना प्रेक्षकांमध्ये बसलेला अकील माली या २४ वर्षीय युवक उठून स्टेजवर गेला आणि त्याने सरळ गौहरच्या कानाखाली वाजवली.
अचानक झालेल्या या हल्ल्याने सेटवर एकच गोंधळ उडाला. गौहर या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका होती. सेटवर कर्मचा-यांनी अकीलला पकडून पोलिसांच्या हवाली केले. गौहर तोकडे कपडे घालते म्हणून तिच्या कानाखाली मारल्याचे अकीलने पोलिस चौकशीत सांगितले. त्याला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केली आहे.
कानाखाली जाळ निघाल्यावर बरी तुला याची आठवण झाली?