प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात दाखल झाले आहेत.
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात दाखल झाले आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर बराक ओबामांच्या एअरफोर्स-वन विमानाचे लँण्डीग झाले.
राजशिष्टाचार बाजूला ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर ओबामा पती-पत्नींचे स्वागत केले. बराक ओबामा यांच्या वाहनांचा ताफा हॉटेलच्या दिशेने रवाना झाला आहे. बराक ओबामा हॉटेलमध्ये थोडावेळ विश्रांती घेऊन, नंतर राष्ट्रपती भवनात जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात बराक ओबामांना मानवंदना दिली जाईल. तेथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींशी ते चर्चा करतील.
त्यानंतर राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहतील. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी व ओबामा यांच्यात चर्चा होईल. रात्री ओबामा यांच्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खास मेजवानीचे आयोजन केले आहे.
ओबामा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या कारर्कीदीत दुस-यांदा भारत दौ-यावर आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.
ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याला सुरुवात झाली आहे. ओबामांच्या या दौ-याच्या निमित्ताने दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील. या दौ-यात अणू, संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतर, आर्थिक, पर्यावरण आदी करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबामा यांनी आग्रा येथील ताजमहाल भेटीचा कार्यक्रम रद्द केल्याबद्दल खेद व्यक्त केला.
President Obama is honored to be back in #India to celebrate Republic Day and to begin a new chapter in the US-India partnership. Jai Hind!
— @NSCPress (@NSCPress)
बहु राष्ट्रीय कंपन्यांचा संचालकांनो घाबरु नका, मोदी आपलेच आहेत.. जसे इराक़ चे सदाम हुसेन आपले होते…