दादागिरी आणि मुजोरीचे दर्शन घडवत प्रवाशांच्या बॅगा आणि बोचकी खेचून अवास्तव प्रवासी भाडे उकळणारे दादर आणि कुर्ला, वांद्रे टर्मिनस परिसरातील टॅक्सीवाले आणि दलाल ‘प्रहार’च्या दणक्यानंतर वठणीवर आले आहेत.
मुंबई – दादागिरी आणि मुजोरीचे दर्शन घडवत प्रवाशांच्या बॅगा आणि बोचकी खेचून अवास्तव प्रवासी भाडे उकळणारे दादर आणि कुर्ला, वांद्रे टर्मिनस परिसरातील टॅक्सीवाले आणि दलाल ‘प्रहार’च्या दणक्यानंतर वठणीवर आले आहेत.
‘टॅक्सीवाले आणि त्यांच्या दलालाकडून प्रवाशांची लूट’ अशा आशयाचे वृत्त गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी पहाटेपासूनच दादर, कुर्ला स्थानकात तंबू ठोकून बसलेल्या प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने शुक्रवारी टॅक्सी चालकांविरोधात कारवाईचा दंडुका उगारला. अनेक टॅक्सीचालकांचे परवाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
दादर टर्मिनसवर सकाळपासूनच लांब पल्ल्यांच्या गाडय़ा येण्यास सुरुवात होते. त्या वेळी टॅक्सीचालक आणि दलाल बाहेरून आलेल्या प्रवाशांची लूट माजवत मनमानी भाडे वसुली करतात. अगदी प्रवाशांसोबत असभ्य वर्तन करण्यापर्यंतही त्यांची मजल जाते.
ही मुजोरी थोपवत आरटीओ विभागाने दणक्यात कारवाई केल्याने टॅक्सी आणि दलालांची पळापळ उडाली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले. ‘प्रहार’च्या वृत्ताबद्दल प्रवाशांकडून धन्यवाद मानले जात आहेत.
कणकवलीतील अव्वाच्या सव्वा भाडे लुटणाऱ्या रिक्षा चालकांना आधी सुधारा ओ ,रिक्षांचे मीटर दुरुस्त करा ,आणि मीटर प्रमाणे भाडे वसूल करा, अशी सक्ती करा!