मुंबईत अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘आरडीएम’ प्रणाली विकसित केली आहे
मुंबई – मुंबईत अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘आरडीएम’ प्रणाली विकसित केली आहे. यात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचे छायाचित्र अपलोड करून स्वत:ची वैयक्तिक माहिती नोंद केल्यानंतर तक्रारदाराला तक्रारींची माहिती ‘एसएमएस’ तसेच ‘इमेल’द्वारे घरबसल्या मिळणार आहे. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर कार्यान्वित झाली असून; दोन दिवसांत मोबाईल अॅप्स सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
महापालिकेने ‘रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट कम्प्लेंट ट्रॅकिंग अँड डेटा मॅनेजमेंट सिस्टीम’ हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रणालीद्वारे नागरिकांना अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांच्या तक्रारी नोंदवता येतील. याबरोबरच या अॅपवर फोटो अपलोड करून तक्रार करता येणार आहे. फोटोबरोबरच आपला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि आधार कार्ड क्रमांकासह स्वत:ची नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच ही तक्रारीची पुढील प्रक्रिया सुरू होईल, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.‘ऑपिलियस डॉट टेक्नोसॉफ्ट’ या कंपनीच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
असा घेतला जाईल मागोवा
संकेतस्थळ अथवा मोबाईलवर फोटो अपलोड करून तक्रार नोंदवल्यानंतर ते महापालिकेच्या इमारत व कारखाना विभागाला वर्ग होईल. तिथून मग सहायक आयुक्त, नामनिर्देशित अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वर्ग होईल. त्यानंतर पुढील प्रत्येक प्रक्रियेची माहिती एसएमएस आणि ई-मेलद्वारे तक्रारदाराला मिळेल. न्यायालयातही याबाबतची योग्यप्रकारे बाजु मांडता यावी याकरता सहायक विधी अधिकारी यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
मि सायन कोळीवाडा, अन्टाँपहिल चर्च, रुम नंबर 26, एकता रहिवासी सेवा संघ, जय महाराष्ट्र येथे राहत आसुन मला एफ नाॅर्थ विभाग लागतो.
मी जिथे राहतो आहे त्या रुमच्या पाठिमागे राहणारे श्रीमती हसिना बादुल्हा यांनी त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम हे अनाधिकृृत केले आहे. तरी त्यांनी केलेले काम हे त्वरीत काढुन टाकावे, हे बांधकाम आम्ही गावी असताना त्यांनी केले आहे. आम्हाला याची काही ही माहीती दिली नाही. तरी त्यावर कारवाही करावी, ही विनती.
तिच्या बांधकामामुळे आमच्या भिंतीला त्रास झाला आहे.
फोन नंबर -८८५०७३६९८६
8898844789
हनुमान नगर परिसर में शासकीय जगह पर मंदिर का अनधिकृत बांधकाम हुआ है जो कि सी .सी . पैसेज तोडकर जगह का अतिक्रमण करके यह अवैध मंदिर बनाया गया है बार बार मंदिर तोडने का नोटीस निकलता है पर तोडक कारवाही होती नही. उल्हासनगर महानगर पालिका के अधिकारी अनधिकृत बांधकाम को सांगनमित करने का प्रयत्न कर रहे है जबकी माहिती का अधिकार २००५ में मिली जानकारी में यह बनाया गया मंदिर अवैध बांधकाम है और इस अवैध बांधकाम को सात दिन में निष्काषित करने कि जानकारी लिखित रूप में दि गई है उल्हासनगर महानगर पालिका, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र.२ इस अवैध बांधकाम पर कोई कारवाही नही कर रहे है अनधिकृत बांधकाम नियंत्रड उपायुक्त भी इस अवैध बांधकाम पर तोडक कारवाही नही कर रहे है