ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अंधेरीच्या कोकीळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना रविवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई – ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अंधेरीच्या कोकीळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना रविवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
छातीतील संसर्गामुळे शशी कपूर यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला होता. शशी कपूर उपचारांना प्रतिसाद देत असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर राम नारायण यांनी दिली.
७६ वर्षीय शशी कपूर यांनी ६० ते ९० च्या दशकात सत्यम शिवम सुंदरम, कभी-कभी, दीवार, त्रिशूल आणि अजूबा असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. दीवारमधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन, २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
यु आर ग्रेट सर ,!आपल्या प्रकृतीत लवकरच सुधारणा हो ओ ! शुभेच्छा !!!!!