तीस वर्षानंतर देवगडमध्ये नितेश राणे यांच्या रूपाने काँग्रेसचा आमदार प्रचंड मतांनी निवडून आल्यामुळे विजयदुर्ग येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला.
विजयदुर्ग- तीस वर्षानंतर देवगडमध्ये नितेश राणे यांच्या रूपाने काँग्रेसचा आमदार प्रचंड मतांनी निवडून आल्यामुळे विजयदुर्ग येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला. विजयदुर्ग काँग्रेसचे अध्यक्ष ग्रेसीस फर्नाडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विजयदुर्ग आगार, विठ्ठलवाडी, गोपाळकृष्णवाडी, हनुमान मंदिर, विजयदुर्ग बंदर अशी विजयी मिरवणूक काढून हा जल्लोष साजरा करण्यात आला.
गेली तीस वष्रे देवगड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार होते. मात्र, या आमदारांच्या निष्क्रियतेमुळे या भागात त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष होता. त्याचा परिणाम या विधानसभा निवडणूकीमध्ये दिसून आला आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे काँग्रेसचे नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी झाले.
येथील भाजपची तीस वर्षाची सत्ता उलथवून काढण्यासाठी नितेश राणे यांनी कंबर कसल्याने आणि यामध्ये त्यांना मोठे यश मिळाल्याने हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी येथील काँग्रेस कार्यकर्ते विजयदुर्ग डेपो येथे जमा झाले आणि फटाके वाजवून तसेच मिरवणूक काढून हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अहंमदशेठ धोपावकर, उपाध्यक्ष बाळा कदम, महेश गुरव तसेच युवक काँग्रेस अध्यक्ष केतन घरकर, विनायक चोडणेकर, दिनेश जावकर, तय्यब धोपावकर, एजाज काजी यांच्यासह मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते यावेळी होते.
गड आला पण ” सिंह गेला ” ! अभिनंदन नितेश राणे जी ,!