नाहूर रेल्वे स्थानकाजवळच्या सीएट टायर कंपनीच्या गोदामात भीषण आग लागली आहे.
मुंबई- नाहूर रेल्वे स्थानकाजवळच्या सीएट टायर कंपनीच्या गोदामात भीषण आग लागली आहे. या आगीत दोनजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि पाण्याचे सहा बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोदामात भीषण आग लागली.
आग विझवण्याचे काम सुरु आहे. ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. टायर कंपनी असल्याने आग वेगाने भडकत आहे. टायरला आग लागल्याने संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
a good service by a Marathi daily