दादरमध्ये एका शाळेत झालेल्या बलात्काराच्या घटनेची गंभीर दखल घेत शाळामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचा विचार करावा, अशी सुचना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिली.
मुंबई- दादरमध्ये शाळेत झालेल्या बलात्काराच्या घटनेची गंभीर दखल घेत शाळामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचा विचार करावा, अशी सुचना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिली.
महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने ही सुचना दिली आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुनावणी सुरू असतांना दादरमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेबाबत सांगितल्यानंतर न्यायालयाने त्यावर चिंता व्यक्त केली. ‘बलात्काराच्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकारने करावा’, अशी सुचना मुंबई उच्च न्यायालयाने केली.
दोन दिवसांपुर्वी दादर सारख्या गजबजलेल्या शहरात शुक्रवारी रात्री एका शाळेच्या प्रसाधनगृहात चौथीच्या मुलीवर शाळेच्या कॅंटीनमधील एका कामगाराने बलात्कार केला होता. त्यामुळे दादर परिसरात खळबळ उडाली होती.
कसले c c T v लावत बसता,त्या rapist xxxla Dadar च्या choukat नेउन गोळ्या ghala . दुसरा xxx असे kritya karayala dhajavnar naahi,