मागील चार वर्षात मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने मंजुरी दिलेल्या बांधकामांच्या प्रस्तावांपैकी तब्बल ११० इमारतींचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई- कॅम्पा कोला कंपाउंडमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यास महापालिकेने उशिरा का होईना कारवाईला सुरुवात केली. मात्र यातून महापालिकेने अद्याप शहाणपणाचे धडे घेतलेले दिसत नाही. मागील चार वर्षात मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने मंजुरी दिलेल्या बांधकामांच्या प्रस्तावांपैकी तब्बल ११० इमारतींचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. माझगावमधील नगरसेविका यामिनी जाधव यांनी मागवलेल्या माहितीला महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी उत्तर दिले.
प्रहार कौल-
[poll id=”697″]
महापालिकेच्या प्रमुख अभियंता विभागाकडून २००७ ते सन २०११ या या चार वर्षाच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या २४ प्रभाग कार्यालयांमध्ये ३८७३ इमारतींच्या बांधकामांना परवानगी दिली होती. यामध्ये शहरी भागात १२ ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली असल्याचे आढळून आले. तर पूर्व उपनगरांमध्ये ३३ ठिकाणी अनधिकृत इमारतींचे बांधकाम झालेले आहे. तर पश्चिम उपनगरातील वांद्रे ते जोगेश्वरी या भागांमध्ये २२ ठिकाणी तर गोरेगाव ते दहिसर या भागांमध्ये ४३ ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी निम्म्याहून अधिक विकासकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करून सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करत पालिकेने चक्क विकासकांनाच अभय दिल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.
मग आता कशाला बोम्बल्ताय ?? माल खा ,आणि चूप बसा !!!