शिक्षणाच्या अधिकारासाठी तालिबानी दहशतवाद्यांच्या गोळ्या अंगावर झेलणारी मलाला युसूफझाई हिच्या पुस्तकावर पाकिस्तानमधील खासगी शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
इस्लामाबाद- शिक्षणाच्या अधिकारासाठी तालिबानी दहशतवाद्यांच्या गोळ्या अंगावर झेलणारी पाकिस्तानी विद्यार्थिनी मलाला युसूफझाई हिच्या पुस्तकावर पाकिस्तानमधील खासगी शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मुलांवर नकारात्मक परिणाम होईल, असे कारण सांगत अखिल पाकिस्तान खासगी शाळा फेडरेशन (एपीपीएसएफ) आणि अखिल पाकिस्तान खासगी शाळा व्यवस्थापन संघ (एपीपीएसएमए) यांनी ही बंदी घातली आहे.
‘आय अॅम मलाला’ या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केलेला नाही किंवा ग्रंथालयातही ते ठेवलेले नाही, असे फेडरेशनचे अध्यक्ष मिर्झा काशिफ अली यांनी ‘द न्यूज डेली टूडे’ या ब्रिटिश दैनिकात दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मलालाने या पुस्तकात स्वत:च्या धर्माबद्दल उलटसुलट विधाने केली आहेत. तिच्यावर पाश्चिमात्यांचा पगडा आहे. या फेडरेशनमध्ये देशातील दिड लाख संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमधील विद्यार्थीनींचे प्रमाण ५० ट्क्के आहे. येथे सात लाख शिक्षक असून त्यात ५० टक्के महिला शिक्षकही आहेत. त्यांच्या मनावर या पुस्तकाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणूनच त्यावर बंदी घातल्याचे मिर्झा यांनी सांगितले.
मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी फेडरेशनमधील सर्व शाळा, कर्मचारी आणि मुलांनी बंद पुकारून त्याचा निषेध नोंदवला होता. मात्र ती पुस्तकात काहीही लिहील आणि आम्ही ते स्विकारु, हे शक्य नाही. ‘निबंध लिहिणे किंवा चर्चासत्रासाठी’ सुद्धा या पुस्तकाचा कोणताही संदर्भ घेण्यावर बंदी घातली असल्याचे मिर्झा यांनी यांगितले.
‘तेहरिक ए तालिबान’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने ‘आय अॅम मलाला’ या पुस्तकाची विक्री करणा-याला मारण्याची धमकी दिली आहे. तसेच पाश्चिमात्यांचे अनुकरण करणा-या मलालाच्या ‘आय अॅम मलाला’ या पुस्तकावर अखिल पाकिस्तान खासगी शाळा व्यवस्थापन संघाच्या ४० हजार संस्थानीही बंदी घातल्याचे अध्यक्ष अदीब जावेदानी यांनी सांगितले.
Tho pakistancha prashna ahe
jara aaplya kade asalelya malala chya batamya dya.