आरे कॉलनीमध्ये लैंगिक अत्याचार झालेल्या दुस-या मुलाचा मंगळवारी सकाळी केईम रुग्णालयात मृत्यू झाला.
मुंबई- आरे कॉलनीमध्ये लैंगिक अत्याचार झालेल्या दुस-या मुलाचा मंगळवारी सकाळी केईम रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या १५ दिवस हा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता. लैंगिक अत्याचार झाल्याच्या लाजेमुळे दोन मुलांनी विष प्रशान केले होते.
आरेमध्ये मोरारजी नगरमध्ये दहा वर्षाचा आणि १३ वर्षाचा ही दोन पिडीत मुले राहत होती. या दोघांनी १२ जुलैली उंदिर मारल्याचे विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र यात १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
१३ वर्षाच्या मुलाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचे किडनी निकामी झाल्यामुळे त्याला परळच्या केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, वडिल चिंतेत असल्याचे पाहून त्या मुलाने उपचारादरम्यान ‘तुम्ही ओरडला म्हणून नाही तर माझ्यावर आणि माझ्या मित्रावर लैगिंक अत्याचार झाले आहेत आणि याच लाजेमुळे आम्ही दोघांनीही विष प्राशन केल्याचे वडिलांना सांगितले. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.
पिडीत मुलाच्या कुटुंबियांचा संताप
आरोपीला जोपर्यंत पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका आरेमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या तेरा वर्षीय मुलाच्या पालकांनी घेतली आहे. मुलाचा मृतदेह पोलीस चौकीसमोर ठेऊन स्थानिकांनी पोलिसांना घेराव घातला आहे. यामुळे पवईत तणावाचे वातावरण आहे.
आतापर्यंत मुलींना धोका होता आता चांडाळ मुलांना पण लक्ष करू लागलेत त्या मुळे भाऊ म्हणून सोबतीला मुलांना पाठवणे धोकादायक ठरले आहे मुंबई पोलीस लवकरच आरोपींना पकडतील यात शंका नाही पण यापुढे मुलांना घरी एकटे सोडून जाऊ नका