पाकिस्तानपासून पॅरिसच्या रस्त्यावर सुरू असलेला दहशतवादाचा नंगानाच थांबवण्यासाठी कारवाई सुरूच ठेवली जाईल.
वॉशिंग्टन – पाकिस्तानपासून पॅरिसच्या रस्त्यावर सुरू असलेला दहशतवादाचा नंगानाच थांबवण्यासाठी कारवाई सुरूच ठेवली जाईल. दहशतवादाविरोधात युद्ध अधिक तीव्र करण्यासाठी आणि तो आटोक्यात आणण्यासाठी कॉँग्रेसने अधिक अधिकार द्यावेत, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली.
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ओबामा म्हणाले की, जागतिक पातळीवर दहशतवादाचा सामना करावा लागणा-या सर्वाच्या पाठीशी अमेरिका उभी राहील.
आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या गटांना उद्ध्वस्त करणार आहोत. अमेरिका व त्याच्या समर्थक देशांना दहशतवादी गटांचा धोका आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. अफगाणिस्तान व इराकमधील युद्धापासून अमेरिका धडा शिकली आहे.
त्यामुळेच आम्ही अफगाणिस्तानच्या खो-यांमध्ये अमेरिकन सैनिक गस्त घालण्याऐवजी आम्ही तेथील स्थानिक सुरक्षा दलांना मजबूत करण्याचे काम करत आहोत.
अमेरिकेवरील मंदीचे सावट दूर
गेल्या सहा वर्षापासून अमेरिकेवर असलेले मंदीचे मळभ दूर झाले आहे. अमेरिकेने मंदीवर विजय मिळवला आहे, अशी घोषणाही ओबामा यांनी केली.
दहशत वाद हा एक कॅन्सर चा रोग आहे