Friday, May 3, 2024
Google search engine
Homeऐसपैसग्रँड चव

ग्रँड चव

दिवाळीचा माहौल म्हणजे खाण्यापिण्याची अगदी रेलचेल असते. सतत काहीना काही गोडधोड समोर येतचं असतं. एरवी पेढयासाठीही आवर्जुन हात पुढे करणारी अनेक खवय्यी माणसं या काळात मिठाईच्या ताटालाही नाही म्हणतात. या गोडधोड खाण्याचा जरा अतिरेक झाला असेल व आपल्या जिव्हेला काही वेगळं चटपटीत खाण्याची इच्छा होणार असेल तर त्यासाठीचा परंपरागत असा पर्याय मुंबईत आहे तो म्हणजे ‘हॉटेल ग्रँड’.
non veg disheक्रॉफर्ड मार्केटच्या जवळ असलेल्या हज हाऊसच्या शेजारी ग्रँड हॉटेल आहे. हे हॉटेल ग्रँड म्हणजे नेमकं कोणतं हॉटेल असा प्रश्न पडला असेल तर याचं दुसरं नाव म्हणजे पोलिस कँटीन. हे हॉटेल सुरु झालं ते १९५० साली. ज्या जागी हे हॉटेल होते त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘गॅन्ट’ या गव्हर्नरचं घर होतं. त्या ठिकाणी ब्रिटीशांनी बांधलेली एक सुंदर इमारत होती. स्वातंत्र्यानंतर ही जागा मद्यप्रतिबंधक विभागाला देण्यात आली. त्या काळात आजुबाजूची जागा ही पोलिसांच्या छावण्यांनी व कारागृहानं व्यापलेली होती. या गव्हर्नर साहेबांच्या बंगल्याच्या समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये लक्ष्मण वर्मा हे नोकरी करत होते. पोलिसांना, कारागृहात चहा वगैरे नेऊन देण्याचं काम ते करत असत. त्यानंतर जेव्हा या जागी नवे कार्यालय आणले तेव्हा अनेकांनी त्यांना इथेच त्यांचे स्वत:चे हॉटेल सुरू करायला सांगितले. सुरुवात झाली ती चहापासून नंतर काही नाश्त्याचे पदार्थ. पोलिसांना साधारण मांसाहारी जेवणाची आवड होती. त्यांनी त्यांना ऑम्लेट वगैरे द्यायला सांगितले. तिथून मग त्यांनी पहिला पदार्थ द्यायला सुरुवात केली तो खिमा पाव. आपल्या खास चवीनं हा खिमा पाव लवकरच पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला. त्याची चव मग कनरेपकर्णी सगळीकडेच पसरली व नंतर सुरू झाली ती पोलिस कॅंटीनची सद्दी. पुढे ही जागा हज हाऊसला देण्यात आली. त्यावेळी सरकार, हज कमिटी यांनी त्यांना एक वेगळी जागा दिली व हे हॉटेल ग्रँड नावानेच इथे १९९६ साली सुरु करण्यात आले. लक्ष्मण वर्मा यांची जुळी मुलं श्रीधर व शेखर वर्मा हे सध्या हे हॉटेल चालवत आहेत. प्रत्यक्ष लक्ष, सर्व मसाले आपल्याच देखरेखी खाली करून घेणं, माशांपासून ते इतर सर्वच खरेदी स्वत: करणं यामुळे या हॉटेलमधल्या पदार्थाना एक खास चव प्राप्त झाली आहे. आपल्या हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे सर्वच पदार्थ हे खास दर्जाचे असावेत यावरही या दोन्ही बंधूंचा कटाक्ष असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत दोघेही जण सर्वच ग्राहकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांना काय हवं नको ते पाहतात. ग्रँड ची चव ही खास त्यांच्या या थेट जनसंपर्कालाही आहे. आतापर्यंत अनेक मोठ मोठया लोकांनीही या हॉटेलमध्ये हजेरी लावली आहे.

आज फोर्ट विभागात कामासाठी येणा-यांच्या पार्टीचं हे अगदी आवडतं असं ठिकाण आहे. तुम्ही जर दुपारच्या वेळी कधी इथे गेलात तर तुम्हाला तातडीने बसायला व जेवायला मिळेल याची शाश्वती कमीच. तुम्हाला काही वेळाची प्रतीक्षा ही करावीच लागणार हे ठरलेलच. एक मात्र खरं की आपण केलेली प्रतीक्षा वाया गेली नाही हे तुम्हाला इथल्या कोणत्याही पदार्थाच्या पहिल्या घासातच लक्षात येईल. ग्रँडची सुरुवात होते ती अगदी सकाळपासूनचं म्हणजे इथे सकाळी खास खिमा पाव खाण्यासाठी अनेक खवय्ये हे मुंबईच्या कानाकोप-यातून येतात. या खिम्याला एक वेगळीच चव आहे. यातला जो तिखटावा आहे त्याला गरम मसाला व मिरची पावडर यांचे एक विशेष मिश्रण व त्याच्या बरोबर ओल्या मसाल्याचा एक जबरदस्त ब्लेंड झाल्याचं लक्षात येतं. एकाच पदार्थात मटणाचा खिमा, लाल तिखट, गरम मसाला व त्याच्या बरोबर आलं लसुणाच्या वाटणाची एक खास चव या खिम्याला येते. आजकाल अनेक ठिकाणी खिमा खातांना आपण भाजीचा खिमा खातोय की काय असं वाटत असतं. इथला खिमा म्हणजे अगदी ताज्या मटणापासून तयार केलेला लुसलुशीत असा असतो. त्याच्या बरोबर पाव तोही ग्रँड हॉटेलसाठी खास तयार करण्यात आलेला. इथला खिमा हा थोडा तिखट असतानाही खिम्यावर एक मिरची दिली जाते. काही खवय्यांना ही मिरचीही प्रचंड आवडते. तुम्हाला जर थोडं तिखट वाटलं तर सोबतीला असते ती लिंबाची फोड व कांदा. इथे नाश्ता करण्यासाठी अनेक पदार्थ तसे उपलब्ध असतात. त्यातही ऑम्लेट पाव, भेजा फ्राय या सा-या गोष्टी इथे मिळतात. तुम्ही जर तीन चार जणांच्या ग्रुपनं नाश्ता करायला जाणार असाल तर इथल्या सगळ्याच पदार्थाची चव तुम्हाला सहज घेता येईल. दुपारच्या जेवणासाठी तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही क्रॉफर्ड मार्केटच्या मासे बाजाराच्या जवळ असलेलं ग्रँड इथे मिळणा-या माशांसाठी अगदी प्रसिद्ध आहे.

fish disheत्याची जाणीव त्यांच्या माशांचे पदार्थ खातांना सहज येते. इथे जर सुरमई थाळी मागवलीत तर त्यात सुरमईचा अगदी मोठा तुकडा येतो. तशीच गोष्ट इतर माशांचीही असते. इथे माशांचे काही खास पदार्थही आहेत. त्यातही स्टफ पापलेट ही इथली खासियत. यात पापलेटच्या आतमध्ये हिरवी पुदिन्याची चटणी भरली जात असते. हे पापलेट नंतर मग मसाल्यात घोळवले जाते व नंतर ते तळले जाते. हे पापलेट कशाही बरोबर खायचं नाही. ते एक पापलेट मागवायचं व त्यावर यथेच्छ ताव मारायचा. लाल मसाल्यातलं पापलेटचं आवरण, त्यात पांढ-या रंगाचं पापलेटचं मांस व आतली हिरवी चटणी याचं असं काही कॉम्बिनेशन होतं की वाह क्या बात है. इथे खिम्याचे अनेक प्रकारही मिळतात. त्यात खिमा भेजा फ्राय खाण्यासाठी अनेकजण अगदी सकाळपासूनचं गर्दी करतात. अंडं व खिमा याचा मिलाफ असलेला खिमा घोटाला हीसुद्धा अनेकांची आवडती डिश. इथे माशांचे काही खास प्रकारही आपल्यासाठी असतात. त्यातल्या त्यात चटणी सुरमईची लज्जत काही न्यारीच असते. काहीशा फिक्या असलेल्या रव्यात तळलेल्या सुरमईचा मोठा तुकडा व त्याच्या बरोबर आलेली खास पुदिनाची चटणी. ही खाण्याचीही एक खास पद्धत आहे. केवळ सुरमईचा एक मांसल तुकडा घ्यायचा व तो पुदिन्याच्या चटणीत घोळवायचा. या घासात मासा, मसाला व पुदिना याचा असा एक सुरेख मिलाफ आपल्या जिभेवर होतो की क्या बात है. त्याच्या बरोबरच खास गावरान कोंबडीचे मटणही आपल्याला समाधान देऊन जातं. इथे अगदी खास तयार करण्यात आलेल्या झिंगा मसाल्याची चवही बराच काळ जिभेवर रेंगाळणारी अशी आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर हा झिंगा मसाला एक वेगळीचं मजा देऊन जातो. यानंतर आपल्याला भात खावासा वाटत असतो मात्र तो थोडया प्रमाणात, आपल्या ग्राहकांची ही गरजही त्यांनी अगदी अचूक ओळखली आहे. इथे आपल्याला एक मुद भातही दिला जातो. जोडीला एका वाटीत कोंबडीचा रस्सा, आपली कितीही इच्छा नसली तरी हा एक मूद भात कमीच पडत असतो. आपल्या कोणत्याही थाळीबरोबर इथे आपल्याला मागवता येतात ते तळलेले बोंबिल. आपण जरी अनेक ठिकाणी कुरकुरीत तळलेले बोबिंल खात असलो तरी इथल्या बोबिंलांची गंमतचं काही और असते. त्याच्या बरोबर अगदी सहज खाण्यासाठी म्हणूनही आपल्याला इथे मांदेली वा इतर गोष्टी खाता येतील. या सगळ्या पदार्थाबरोबरच इथली खास बिर्याणी ही खायलाच हवी. इथे येणारे अनेकजण हे आपल्या लंच टाइममध्ये येत असतात. त्यांना कधी कधी पटकन काहीना काही खाऊन निघायचे असतं. त्यांच्यासाठी हा बिर्याणीचा पर्याय अगदी चांगला व योग्य असा आहे. ग्रँडच्या सर्वच गोष्टी या अशा वेगवेगळया वैशिष्टयांनी आपल्यासमोर येत असतात.

आतापर्यंत अनेक दिग्गजांनी गौरवलेले अशी ओळख असली तरी ग्रँडचे मालक लक्षात राहतात ते त्यांच्या विनम्र स्वभावामुळे व त्यांच्या आतिथ्यशिलतेसाठी. ही चव, ही वागणूक एकदा तरी अनुभवायला हवीच, ती एकदा का अनुभवलीत की त्याची आपल्याला सवय होऊन जाणार हे निश्चितच.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट