सर्वच धर्माचे संत सत्संगाचं महत्त्व का सांगतात? चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आपल्याला चांगले गुण आत्मसात करता येतात. आपल्यावर चांगले संस्कार होतात.
सर्वच धर्माचे संत सत्संगाचं महत्त्व का सांगतात? चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आपल्याला चांगले गुण आत्मसात करता येतात. आपल्यावर चांगले संस्कार होतात. मनातले विकार, वाईट विचार गळून पडतात. आपण ज्या पावन लोकांच्या सहवासात असतो, त्यांच्याप्रमाणेच आपलंही जीवन पावन व्हावं, याची प्रेरणा मिळते. यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा सहवासच टाळावा, असं वीरशैव संतकवी लक्ष्मणमहाराज म्हणतात. या संदर्भातील त्यांचा एक अभंग असा आहे –
खळांची संगती, दु:खाशी कारण।
होता अपमान, मोठें दैन्य।।
महत्त्व जातसे, अपकिर्ती होत।
कुसंगाची मात ऐशी आहे।।
कस्तुरीचे पोतें हिंगाने नासिलें।
मोल कमती आलें संगतीने।।
शिंदी वृक्षाखालीं दूधपान केलें।
संगाने आणिलें हीनत्वासी।।
लक्ष्मण म्हणे, सुसंगती सार।
कीर्तीने अंबर भरतसे।।
सत्पुरुषांच्या नि संतमहात्मांच्या संगतीत राहिल्यानं अपार सुख मिळतं, तर वाईट लोकांच्यात राहिल्यानं अमाप दु:खं भोगावी लागतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही वाईट कृत्य करू लागतो. या वाईट कृत्यांमुळे समाजात आपली अप्रतिष्ठा होते, अपमान होतो. सत्पुरुषांच्या संगतीमुळे आपल्याला सुसंस्कारांचं वैभव मिळतं, तर दुर्जनांच्या संगतीमुळे आपलं जीवन दीनवानं होतं. कळाहीन होतं. शिवाय त्यामुळे आपली अपकिर्ती होते, ती वेगळीच.
हे स्पष्ट करण्यासाठी लक्ष्मण महाराज एक-दोन दृष्टांतही देतात. कस्तुरीचा सुगंध अप्रतिम असतो, पण कस्तुरीच्या पोत्यात चुकून हिंगाचा खडा पडला तर कस्तुरीचा सारा सुगंध नाहीसा होतो. केवळ हिंगाचा ‘सहवास’ कस्तुरीचे सारे गुण क्षणभरात नाहीसे करून टाकतो.
तुम्ही शिंदीच्या झाडाखाली बसून दूध प्यायलात तरी लोक काय समजणार? शिंदीच्या झाडाखाली बसलेला माणूस त्या झाडाला लावलेल्या मडक्यातली शिंदी किंवा ताडीच पित असला पाहिजे, असं कुणाला हे दृष्य पाहिल्यावर वाटलं तर त्यात नवल ते काय?
चांगल्या माणसानं शिंदीच्या झाडाखाली बसावचं कशासाठी? त्याचप्रमाणे आपण दुर्जनांच्या संगतीत राहूनही वाईट कृत्य केली नाहीत तरी आपली अपकीर्ती होणारंच. तेव्हा कुसंगतीची आपल्या मनात उगवलेली ही विषारी वेल, वेळीच मुळासकट उपटून फेकून दिली पाहिजे. दुर्जनांची संगती टाळली पाहिजे.
सद्गुणी माणसांच्या सहवासात राहावं म्हणजे त्यांच्यापासून आपल्यालाही चांगली कृत्य करण्याची प्रेरणा मिळेल व आपल्या मनात सुविचार दरवळतील. त्यामुळे आपण सत्कृत्य करू. त्यांच्या कीर्तीनं आकाशदेखील भरून जाईल. दिशा नि क्षितिजं उजळून निघतील.
Pail To Ge Kahu Koktahe
Shakun Ge Maye Sangtahe
U Dud Re Kau Tuze Sonyane Madhvin Pau
Pahune Pandarirao Ghara Kai Yeti
Dahibhatachi Undi Lavin Tuze Tondi
Jeewa Padhiye Tyachi Godi Sang Vegi
Dudhe Bharuni Wati Lavin Tuze Oothi
Satay Sange Goti Vitho Yeil Kayi
Aambya Dahali Fale Chumbi Rsali
Aajich Re Kali Shakun Sange
Dyandev Mahne Janiyje Ye Khune
Bhetati Pandhariraya Shakun Sange
रेंगार्ड्स
गणेश
मराठी ट्रान्सलेशन