ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार (अण्णा) विनायक बेटावदकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘अनंत हरी गद्रे’ पुरस्कार मिळाल्याने त्यांचा कल्याण च्या सार्वजनिक वाचनालय या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने शनिवारी जाहीर सत्कार करण्यात आला.
कल्याण- ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार (अण्णा) विनायक बेटावदकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘अनंत हरी गद्रे’ पुरस्कार मिळाल्याने त्यांचा कल्याण च्या सार्वजनिक वाचनालय या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने शनिवारी जाहीर सत्कार करण्यात आला. दैनिक ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जनता बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले अॅडव्होकेट सुरेश पटवर्धन यांचाही सत्कार कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते करण्यात आला. चांगल्या बातम्या प्रकाशित होणे कमी झाले आहे. चांगल्या बातम्या छापण्याकरता आता वाचकांनीच वाचक चळवळ सुरू केली पाहिजे.
सध्याची पत्रकारितेत गुन्हेगारी स्वरुपातल्या बातम्यांचे मोठय़ा प्रमाणात वृत्त संकलन होते, हे कमी झाले पाहिजे. सकारात्मक पत्रकारिता सध्याच्या स्थितीत गरजेची आहे.
या सकारात्मक पत्रकारितेचे धडे मला जुन्या जाणत्या पत्रकारांकडून मिळाले. यात अप्पासाहेब खाडीलकर, नानासाहेब गोरे यांचे मागदर्शन लाभले. यात यशस्वी होण्याकरता वेळेचे नियोजन आवश्यक आहे. असे सत्काराला उत्तर देताना अण्णा बेटावदकर म्हणाले.
सार्वजनिक वाचनालयाच्या रोटरी सभागृहात हा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी ‘समाजातील राजकारणी आणि पत्रकार, दोन घटक’ या विषयावर ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे यांनी मत व्यक्त केले. ‘चारित्र्यवान माणसे घडवण्याची जबाबदारी आता पत्रकारांवर आली असल्याचे भावे यांनी स्पष्ट केले. तसेच सध्याच्या काळात पालकांकडून घरातील लहानग्यांची योग्य ती पुरेशी दखल घेतली जात नसल्याचेही ते म्हणाले.
आताची तरुण पिढी मोबाईल इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहे. वाचन संस्कृतीचा विसर युवा पिढीला पडला आहे. या खोटय़ा चेह-यांच्या बाजारात आपली नतिकता कायम राखून सामाजिक कामे करण्याची आवश्यता असल्याचे भावे म्हणाले.
प्रामाणिक माणूस या देशाचा कणा असून पत्रकारितेच्या माध्यमातून अशा लोकांची दखल घेऊन त्याची जाणीव समाजाला करून देण्याची जबाबादारी पत्रकारितेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचा तर कल्याण जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ वकील सुरेश पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक वाचनालयातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
abhinandan
मी आपल्या प्रहारच नियमित वाचक आहे. इतर वर्तमानपत्राप्रमाणे आपल्या प्रहारची प्रतिक्रिया देण्याची पद्धती सुटसुटीत करा आणि काही चांगल्या बातम्या आमच्या मुखपुस्तक (fb ) घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्या , अनेक वाचक त्यामुळे प्रहर आवडीने वाचतील , हयची नोंद घ्या आणि जमल्यास त्याची नोंद mahmaza1@gmail.com मुखपुस्तक / gmail द्या (क्याप्चा काढून टाका , सारखा चुकतो व कळवण्याचा कंटाळा येतो.
बातमीच्या खाली असलेल्या Share it चा ऑप्शन चा वापर करा… आणि FB वर बातमी शेअर करा…