राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात एका महिलेने बोरिवली पोलिस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात एका महिलेने बोरिवली पोलिस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन, लक्ष्मणराव ढोबळेंनी आपल्यावर तीनवेळा बलात्कार केला असा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. २०११ ते २०१३ या तीनवर्षात ढोबळेंनी तीनवेळा बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेकडे पुराव्यादाखल काही छायाचित्रेही आहेत.
मुंबईतल्या बोरिवली परिसरात ढोबळे यांच नालंदा लॉ कॉलेज. त्याच महाविद्यालयात पीडित महिला नोकरी करते. बोरिवली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन ढोबळें विरोधात कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण राव ढोबळे यांनी मात्र आपल्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदार महिलेने आपल्या शिक्षण संस्थेत ८० लाखांचा गैरव्यवहार केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आपण त्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली म्हणून सूडभावनेने संबंधित महिलेने आपल्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे ढोबळेंनी सांगितले. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मंत्री असे करणार नाही तरी याची chaukashi व्हावी .