जम्मू-काश्मीरमधील राजकीय अनिश्चिततेचे सावट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील राजकीय अनिश्चिततेचे सावट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत न मिळाल्याने राज्यपाल राजवट असलेल्या राज्यात लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील पत्र अब्दुल्ला यांनी राज्यपाल व्होरा यांना दिले आहे.
१८ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पीडीपीला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २५ आणि नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते.
सत्ता स्थापनेसाठी कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहूमत नसल्यामुळे दोन किंवा अधिक पक्षांमध्ये आघाडी होणे आवश्यक होते. मात्र त्याला यश न आल्याने राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
अब्दुल्ला यांची पक्षाच्या सर्व आमदारांसोबत बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी राज्यात भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देऊ नये असे मत व्यक्त केले. या बैठकीनंतर पक्षाने भाजपला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल कॉन्फरन्स राज्यातील प्रादेशिक पक्ष पीडीपीला पाठिंबा देणार असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन आठवड्यांनीही सर्वात मोठ्या दोन पक्ष असलेल्या पीडीपी आणि भाजपमधील चर्चा यशस्वी न झाल्याने राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
कुठल्याही परिस्थितीत काश्मिरी मुसलमान गैर मुस्लिम व्यक्तीस काश्मीरचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.ते अतिशय मतलबी आहेत.त्यांना कितीही मदत/पैसा ध्या पण ते भारतीय जनतेचे आभार मानणार नाही किंवा कृतज्ञता व्यक्त करणार नाही.कडू कारले तेलात,साखरेत टाळले/घोळले तरी त्याचा कडूपणा जाणार नाही तसे काश्मिरी मुसलमानांचे आहे.