आम आदमीची साथ मिळवून सत्तेत आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दोन महिन्यांच्या वीजबिलाचा खर्च ९१ हजार रुपये आला आहे.
नवी दिल्ली – आम आदमीची साथ मिळवून सत्तेत आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दोन महिन्यांच्या वीजबिलाचा खर्च ९१ हजार रुपये आला आहे.
सिव्हील लाईन्स येथील केजरीवालांच्या सरकारी निवासस्थानाचे एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून वीज बिल ९१ हजार रुपये आल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने केजरीवालांच्या दोन महिन्यांच्या वीज बिलाच्या प्रती अर्जदाराला उपलब्ध करुन दिल्या. पेशाने वकिल आणि आरटीआय कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी माहिती अधिकारातंर्गत केजरीवालांच्या वीज बिलाची माहिती मागितली होती.
केजरीवालांचे वीज बिल एक लाखापेक्षाही जास्त असल्याचा दावा दिल्ली भाजपाने केला असून, पुढच्या काही दिवसात आपच्या अन्य मंत्र्यांच्या वीज बिलाची माहिती मागवणार असल्याचे सांगितले.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वीजेचे दोन मीटर असून, ताजे बिल अनुक्रमे ५५ हजार आणि ४८ हजार रुपये असल्याचा दावा दिल्ली भाजपाचे प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी केला आहे.
राजकारणी पैसे खातात हे माहित होते.पण वीज सुधा खातात हे प्रथमच वाचत आहे.