उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात मंगळवारी रात्री घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याप्रकऱणी तिस-या संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली.
बदाऊन – उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात मंगळवारी रात्री घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याप्रकऱणी तिस-या संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. तसेच या प्रकरणी दोन कॉन्स्टेबलचेही निलंबन करण्यात आले.
याप्रकरणी कॉन्स्टेबल छत्रपाल यादव आणि सर्वेश यादव या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संशयित अवधेश यादव यालाही शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पोलिस सर्वेश यादव याचा भाऊ पप्पू याला गुरुवारी अटक करण्यात आली होती अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल कुमार यांनी दिली.
दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर, न्यायवैद्यक अहवालात मृत्यूपूर्वी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी एक १४ वर्षाची तर दुसरी १५ वर्षाची होती व त्या चुलत बहिणी होत्या. मंगळवारी रात्रीपासून त्या दोघी बेपत्ता होत्या व दुस-या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडले.
all women Girls should leave India