मागच्या काही महिन्यांपासून भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सतत कौतुक करणा-या माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी सक्रीय राजकरणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली – मागच्या काही महिन्यांपासून भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सतत कौतुक करणा-या माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी सक्रीय राजकरणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. बेदी भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता असून, त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपकड़ून प्रस्तुत केले जाईल अशी चर्चा आहे.
I no more rule out entering indian political service on capability basis. I am moving towards some flexibility in this.
— Kiran Bedi (@thekiranbedi) May 20, 2014
क्षमतेच्या आधारावर मी राजकरणात प्रवेश करण्याची शक्यता फेटाळून लावलेली नाही असे किरण बेदींनी टि्वट केले आहे. भाजपचे दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्षवर्धन लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर, बेदींना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून प्रस्तुत करण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आश्वासन दिल्याची माहिती मिळत आहे.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतरच दिल्लीतील काही महत्वाच्या राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किरण बेदी एकाबाजूला अरविंद केजरीवालांवर बोचरी टीका करत होत्या तर, नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळत होत्या. दिल्लीत काँग्रेस आपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता मावळल्याने दिल्लीत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता वाढली आहे.
होय दिल्लीच्या भाजपा मुख्यमंञी म्हणुन किरण बेदी यांना माझे पुर्ण समर्थन