‘आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खाते,’ असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शाकाहारीचे फायदे सांगितले आहेत.
नवी दिल्ली- ‘आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खाते,’ असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शाकाहारीचे फायदे सांगितले आहेत. द इव्हिडन्स-मीट किल्स’ या चित्रपटाच्या मुहुर्तावेळी त्या बोलत होत्या.
मयंक जैन दिग्दर्शित ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या चित्रपटात मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती दिली जाणार आहे. या चित्रपटाच्या मुहुर्तावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे दुष्पपरिणाम पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या. मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचे मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासाला आकडेवारीचादेखील आधार आहे,’ असे मनेका गांधींनी म्हटले. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असेही त्या म्हणाल्या.
‘जर तुम्ही नियमित मांसाहार केलात, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. मात्र त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असे म्हणत मनेका गांधींनी शाकाहाराचे समर्थन केले.
मांसाहार करावा की करु नये, हे प्रत्येकाने ठरवावे, असं म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले. मुले जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असतात त्यादरम्यान त्यांना डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, असे म्हणत मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या कालावधीत डॉक्टर कसे व्हावे हे शिकवले जाते. मात्र आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
मांसाहार मुळे तो मनुष्य हिंसक ,रागीट ,क्रोधी बनतो आणि
शाकाहारी जेवणाने माणसाचे आचार ,विचार,स्वभाव हे देखील शाकाहारीच होतात
त्यामुळे ” शाकाहार उत्तम आहार “