सामूहिक बलात्कारप्रकरणातील पीडित तरुणीच्या निधनानंतर दोन दिवसांनी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एक हजार पानेचे आरोपपत्र तयार केले आहे.
नवी दिल्ली- दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील पीडित तरुणीच्या निधनानंतर दोन दिवसांनी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एक हजार पानेचे आरोपपत्र तयार केले आहे. हे आरोपपत्र मंगळवारी एक जानेवारी २०१३ रोजी न्यायालयात सादर केले जाणार आहे.
आता तरी… जागे व्हा!
दिल्लीत १६ डिसेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी कायदेतज्ञाच्या मदतीने आरोपपत्र दाखल केल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले. या आरोपपत्रात ३० साक्षीदाराच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आरोपपत्रात करण्यात आली आहे.
या आरोपपत्रात १६ डिसेंबर रोजी झालेल्या घटनेसंदर्भात तसेच पीडित मुलीला देण्यात आलेल्या वैद्यकीय उपचाराची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलीला उपचारासाठी दिल्लीहून सिंगापूरमध्ये नेण्यात आल्याचे तेथे तिचा उपचारादरम्यान झालेला मृत्य याचा तपशील देण्यात आला आहे. पोलिसांना सहा आरोपींविरुद्ध बलात्कार, खुन आणि अन्य गुन्ह्याप्रकरणी आरोप दाखल केले आहेत.
या घटनेनंतर दक्षिण दिल्लीतील इंडिया गेट, रायसिना हिल आणि राष्ट्रपती भवन परिसरात मोठ्याप्रमाणात निदर्शने करण्यात आली होती.
[EPSB]
आता तरी… जागे व्हा!
कायदे बदलून महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल का? डोळ्यादेखत घडणा-या अशा प्रकारांविरोधात आवाज उठवण्यास समाजही कमी पडतो आहे का? स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी का? समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल? यावर आपली मते द्या….
[/EPSB]
This arlitce keeps it real, no doubt.