गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे दरमहा मानधन फक्त १२ हजार ५५३ रुपये आहे, असा दावा उमेदवारी अर्जाबरोबरच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
अहमदाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे दरमहा मानधन फक्त १२ हजार ५५३ रुपये आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. मात्र, मोदी यांनी मणिनगर मतदारसंघातून भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरच्या प्रतिज्ञापत्रात असा दावा करण्यात आला आहे. एका वरिष्ठ सरकारी शिपायापेक्षाही मोदी यांचे मानधन कमी आहे. असे असले तरी गेल्या पाच वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत तिपटीने वाढ झाली आहे. २०११-२०१२ या वर्षात मोदी यांचे वार्षिक उत्पन्न १,५०,६३० इतके दाखवले आहे तर एकूण मालमत्ता अंदाजे एक कोटीच्या आसपास आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे. नगरसेवक, आमदार, खासदार यासारख्या लोकप्रतिनिधींना दरमहा मानधन आणि भत्ते मिळून गलेलठ्ठ रक्कम मिळते. मंत्र्यांना दरमहा ६६ हजार तर आमदारांना ५६ हजार रुपये मानधन मिळते. त्याबरोबरच घर, नोकरवर्ग, प्रवास आणि इतर गोष्टींसाठी भत्ते मिळतात, ते वेगळेच.
प्रतिज्ञापत्रात समाजसेवा हा मोदी यांनी आपला व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. अनेक विशेष म्हणजे, २००७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा उल्लेख केला नव्हता. गांधीनगरमधील ३३० चौरस फुटाची सुमारे एक कोटी रुपयांची जमीन ही एकमेव मालमत्ता असल्याचे मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मोदी यांच्या खात्यात २००७ मध्ये ११ हजार २०० रोकड होती ती आता कमी होऊन ४,७०० इतकी झाली असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
How thease people can manage this? Can you belive if you have 4700K in your account and you go for election. Even village SARAPANCH can’t do that!!!