कोकणातील विकासात्मक आणि विधायक घडामोडी, बातम्या, सामाजिक संस्था-व्यक्तींचे दिशादर्शक कार्य हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यासाठी aaplekokan.com ही वेबसाइट साकार होत असून गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर या साइटचे प्रकाशन होणार आहे.
मुंबई- कोकणातील विकासात्मक आणि विधायक घडामोडी, बातम्या, सामाजिक संस्था-व्यक्तींचे दिशादर्शक कार्य हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यासाठी aaplekokan.com ही वेबसाइट साकार होत असून गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर या साइटचे प्रकाशन होणार आहे.
कोकणच्या संस्कृती-परंपरांचे, कोकणच्या निसर्गवैभवाचे दर्शनही या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाचे विशेष सचित्र दर्शन घडवण्याचा प्रयत्न या साइटवरून होणार आहे. त्याचप्रमाणे कोकणाशी निगडित दिवाळी ई-विशेषांकही प्रकाशित होणार आहे.
कोकणाविषयी जिव्हाळा बाळगणाऱ्या व्यक्तींनी या साइटसाठी कोकण परिसरातील बातम्या, विशेष लेख, छायाचित्रे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- shail@aaplekokan.com, vinod@aaplekokan.com.
I trying to do somthing to Develop this Web.