मुंबईतील मेट्रो रेल्वेमध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रोच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.
मुंबई- मुंबईतील मेट्रो रेल्वेमध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रोच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. काही ठिकाणी सरकते जिनेही बंद पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्याने घाटकोपर ते अंधेरी दरम्यान गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
यामुळे मेट्रोचे वेळापत्रक कोलमडले असून मेट्रोच्या सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. त्यातच काही स्थानकांवर इंडिकेटर्स बंद पडल्याने प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडली.
मुंबईतील मेट्रो बंद करां