बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम्’ हा चित्रपट येत्या ३१ जुलैला प्रदर्शित होत आहे. अजय देवगणसह श्रिया सरन आणि तब्बू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला असून हा एक मलायळाम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बू आणि अजय १६ वर्षानंतर एकत्र पडद्यावर पाहिला मिळणार आहेत.