हुदहुद वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्रप्रदेश राज्याला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
विशाखापट्टणम – हुदहुद वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्रप्रदेश राज्याला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश दौ-यावर गेले आहेत. यावेळी पंतप्रधानांकडून राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत तसेच या वादळातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच आंध्रप्रदेशमधील या संकटकाळात केंद्र सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचेही मोदी म्हणाले.
हुदहुद वादळामुळे आंध्रप्रदेश राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विझियानगरम, पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. विशाखापट्टणमच्या किनारपट्टी भागातही या वादळाचा मोठा तडाखा बसला. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत.