नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या अँपलच्या दोन नवीन आयफोनवर वोडाफोन मोफत सुविधा देणार आहे.
नवी दिल्ली- नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या अँपलच्या दोन नवीन आयफोनवर वोडाफोन मोफत सुविधा देणार आहे. ‘आयफोन ६एस’ आणि ‘आयफोन ६ एस प्लस’ची खरेदी करणा-या ग्राहकांना वोडाफोन आठ हजार ८८५ रुपयांचा डेटा आणि व्हाईस कॉलिंग मोफत देणार आहे.
‘आयफोन ६एस’ आणि ‘आयफोन ६एस प्लस’ हे दोन्ही आयफोन येत्या १६ ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या आयफोनची खरेदी करणा-या ग्राहकांना एक हजार २९९ रुपयांचा प्लॅन मोफत मिळणार आहे.
तसेच ३ जीबी मोबाईल इंटरनेट, ४००० लोकल आणि एसटीडी मिनिटे आणि १ हजार ५०० लोकल आणि एसटीडी मॅसेजची मोफत सुविधा दिली आहे.
हा प्लॅन सहा महिन्यांसाठीच आहे, असे वोडाफोन कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
आयफोन ६एसची किंमत ६२ हजार तर आयफोन ६एस प्लसची किंमत ९२ हजार आहे.