इशरत जहा बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने मंगळवारी आयबीचे विशेष संचालक राजिंदर कुमार यांची त्यांच्या गांधीनगर येथील कार्यालयात चौकशी केली.
गांधीनगर – इशरत जहा बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने मंगळवारी आयबीचे विशेष संचालक राजिंदर कुमार यांची त्यांच्या गांधीनगर येथील कार्यालयात चौकशी केली.
शरत जहा प्रकरणातील भूमिकेबद्दल सीबीआयने दुस-यांदा राजिंदर कुमार यांची चौकशी केली आहे. १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ वर्षीय इशरत जहा आणि चौघांना दहशतवादी ठरवून बनावट चकमकीत त्यांची हत्या केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार राजिंदर कुमार यांनी गुजरात पोलिसांना लष्कर-ए-तोएबाचे दहशतवादी नरेंद्र मोदींना मारण्यासाठी अहमदाबादला येत असल्याची टीप दिली होती.
सीबीआय चौकशीत राजिंदर कुमार यांची भूमिका माहिती देण्यापुरती मर्यादीत नसून, चकमकीतही त्यांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. गुजरात उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासात हे संपूर्ण इशरत जहा चकमक प्रकरण बनावट असल्याचे सिध्द झाले आहे.