भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद अमजद अली खान यांची सरोद विमानप्रवासादरम्यान गहाळ झाली आहे.
नवी दिल्ली – भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद अमजद अली खान यांची सरोद विमानप्रवासादरम्यान गहाळ झाली आहे. ब्रिटिश एअरवेज विमानातून लंडनहून दिल्लीला येताना ही सरोद गहाळ झाली. गेल्या ४५ वर्षांपासून ते ही सरोद वापरत आहेत.
२१ जूनला एका कार्यक्रमासाठी ते आपली पत्नी शुभालक्ष्मी यांच्यासह लंडनमधील डर्टिंग्टन येथे गेले होते. २८ जूनला ते लंडनहून भारतात येण्यासाठी निघाले होते. या प्रवासदरम्यान त्यांची सरोद गहाळ झाली. या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही सरोदचा शोध लागला नसल्याने खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गहाळ झालेली सरोद शोधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे विमान अधिका-यांनी स्पष्ट केले आहे