दूरसंपर्क कंपनी एअरसेलने खास आपल्या मुंबईकर ग्राहकांसाठी सामूहिक टॉकटाइम योजना सादर केली आहे.
मुंबई- दूरसंपर्क कंपनी एअरसेलने खास आपल्या मुंबईकर ग्राहकांसाठी सामूहिक टॉकटाइम योजना सादर केली आहे. याअंतर्गत नवीन ग्राहकांना अमर्यादित एअरसेल ते एअरसेल टॉकटाइम मिळणार आहे. तसेच एसएमएस, एसटीडी आणि डेटा सेवांमध्येही ग्राहकांना फायदे मिळणार आहेत.
या योजनेंतर्गत नवीन ग्राहकांना पहिल्यांदा १०५ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार असून, त्यात ५० रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे. तसेच एअरसेल ते एअरसेल अमर्यादित फ्री लोकल कॉल करता येणार आहेत. मात्र याची ३० दिवसांचीच वैधता राहणार असून, तीन वाढवण्यासाठी १००च्या पटीतील रिचार्ज करावा लागणार आहे. या योजनेत लोकल कॉल दर १.२ पैसे प्रतिसेकंद आणि एसटीडीसाठी १.५ पैसा प्रतिसेकंद असणार आहे. तर एसएमएस दर स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यासाठी अनुक्रमे १, १.५ आणि पाच रुपये राहतील. हे दर एक वर्षासाठी वैध आहेत.