डेस्कटॉप निर्मितीतील एसर इंडिया या कंपनीने आपल्या ऑल इन वन पीसी श्रेणीतील ‘एस्पायर झेड सीरिज’ बाजारात दाखल केली आहे.
डेस्कटॉप निर्मितीतील एसर इंडिया या कंपनीने आपल्या ऑल इन वन पीसी श्रेणीतील ‘एस्पायर झेड सीरिज’ बाजारात दाखल केली आहे. कमी जागा व्यापणारा हा डेस्कटॉप पीसी एक वाढीव हाय डेफिनेशन होम एंटरटेन्मेंट अनुभव मिळवून देतो. विंडोज आठ यंत्रणेसाठी हे डिझाइन तयार करण्यात आलं असून, अद्ययावत ग्राफिक वैशिष्टयांनी युक्त आहे. या सडपातळ ऑल इन वन डेस्कटॉप पीसीचं कूलिंग डिझाइन जास्त उष्णतेपासून संरक्षण देते. मॅट फिनिशिंग असलेला काळा रंगामुळे या डेस्कटॉपचं बाह्यरूप अत्यंत देखणं दिसतं.
डिस्प्ले आणि स्पीकर्स
२१.५ एलईडी एलसीडी फुल एचडी विंडस्क्रीनमध्ये १६.९ ऑस्पेक्ट रेशो आणि १९२० बाय १०८० स्थानिक रिझॉल्युशन असलेल्या या एस्पायर झेडमधून चित्र अत्यंत दर्जेदार दिसतं. त्यामुळे पाहणाऱ्याच्या दृष्टीचीही काळजी घेतली जाते. डॉलबी होम थिएटर व्ही ४.० तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या या ऑल इन वन रचनेद्वारे उत्तम आवाजाचा दर्जा मिळत असून, त्यामुळे ग्राहकांना संपूर्ण होम एंटरटेन्मेंटचा अनुभव मिळतो.
उपकरणाचं वैशिष्टय म्हणजे यातील जेस्टर कंट्रोल. त्यामुळे हँड जेस्टर रेकग्नेशनद्वारे वापरकर्त्यांला उपकरणावर नियंत्रण ठेवता येते. यूएसबी ३.० सारख्या विविध वैशिष्टयांचा समावेश त्यात असून, माहितीचे वेगवान वितरण, वायफाय आणि ब्लूटूथद्वारे संपूण कनेक्टिव्हिटी मिळू शकते. डिजिटल फाइल्सच्या सुलभ वितरणासाठी मल्टिइन एक कार्ड रीडरसोबतच एसरच्या झेड सीरिजमध्ये ०.९ एमपी वेबकॅम अँगल अॅडजेस्टमेंटसह देण्यात आला आहे. त्यात – २ अंश ते १३ अंशांपर्यंतचं तापमान सहन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सुलभ वापर आणि प्रत्यक्ष संपर्क अनुभवही मिळू शकतो.
वापरकर्त्यांचाच अनुभव आणखी वाढवण्यासाठी एसेरने आपल्या ग्राहकांना ५०० जीबी एचडीडी स्टोअरेज स्पेस दिली असून, त्याबरोबर डाटा वितरण, एसर क्लाउडद्वारे संगीत जे कोणत्याही वेळी इतर सर्व उपकरणांशी जोडले जाऊ शकते, यांचाही समावेश आहे. होम एंटरटेन्मेंट यंत्रणेतील आपल्या संपूर्ण क्षमतांचा आनंद लुटण्यासाठी या पीसीमध्ये सुपर मल्टी डीव्हीडी रीडरचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय एक सडपातळ आणि मल्टिमीडिया वायरलेस की-बोर्ड आणि माऊसही आहे.
एसरकडून ग्राहकांना एसर झेड सीरिज खरेदी केल्यानंतर तीन वर्षाचे ऑन साइट सहकार्य देऊन अतिरिक्त फायदाही मिळू शकतो.
किंमत : २९,९०० रुपये