काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना टार्गेट करण्याचे सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरत असून, या प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली- ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना टार्गेट करण्याचे सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरत असून, या प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिले आहे.
‘ऑगस्टा’प्रकरणात काँग्रेस नेते व आपल्यावर होणारे आरोप निराधार असून आपण कोणत्याही कार्यवाहीला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पुरावे कुठे आहेत, केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी हे उद्योग सुरू असून जनतेला हे चांगलेच ठाऊक आहे, असेही त्या म्हणाल्या.
गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारने ही चौकशी का पूर्ण केली नाही? त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सोनियांविरोधात भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्याने गदारोळ झाला. काँग्रेस सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत घोषणा दिल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.