ऑलिंपिक खेळांनी क्रिकेटकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असा टोमणा ‘द वॉल’ राहुल द्रविडने या योजनेसंबंधी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रात बोलावलेल्या बैठकीदरम्यान मारला.
नवी दिल्ली – ऑलिंपिकमध्ये भारताला अधिकाधिक पदके मिळावीत म्हणून क्रीडामंत्रालयातर्फे ‘टारगेट ऑलिंपिक पोडियम योजना’ (टीओपी) राबवली जात असतानाच, ऑलिंपिक खेळांनी क्रिकेटकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असा टोमणा ‘द वॉल’ राहुल द्रविडने या योजनेसंबंधी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रात बोलावलेल्या बैठकीदरम्यान मारला.
‘‘प्रत्येक खेळ हा खेळ असतो. त्यातील प्रगती आणि यश त्या त्या खेळाचे मोठेपण अधोरेखित करते. भारतात क्रिकेटपटूंची कामगिरी लक्षणीय आहे. त्यामुळे अन्य क्रीडापटूंनी क्रिकेटपटूंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे,’’ असे द्रविडने म्हटले. २०१६ आणि २०२० ऑलिंपिकमध्ये अधिकाधिक पदके मिळवण्यादृष्टीने स्थापन केलेल्या ‘टारगेट ऑलिंपिक पोडियम योजने’त द्रविडसह आठ ‘स्टार’ क्रीडापटूंचा समावेश आहे. मात्र अव्वल बॉक्सर एमसी मेरी कोम, महान प्रशिक्षक,बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद आणि ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा तसेच अंजू बॉबी जॉर्जसारख्यांचा समावेश असताना आपला समावेश केल्याबद्दल ‘द वॉल’ने आश्चर्य व्यक्त केले.
‘‘क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांना सध्या चांगले दिवस आलेत. ऑलिंपिकसह आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धात आपल्याला अनेक पदे मिळताहेत. तसेच ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणा-या क्रीडापटूंचा शोध घेण्याची योजनाही उत्तम आहे. गेली अनेक वर्षे मी आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्सशी कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंना समितीवर नेमण्याचा हेतू चांगला असला तरी माझी निवड का केली, हे मला कळले नाही. समितीवरील अन्य क्रीडापटूंबाबत माझी तक्रार नाही. मात्र अभिनव, गोपि आणि अंजू असे सरस माजी क्रीडापटू आपल्याकडे आहेत. त्यांच्या त्यांच्या खेळाबद्दल खूप ज्ञान आहे,’’ असे द्रविडने म्हटले.