पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणा-या दौ-यासाठी भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाची निवड ‘हॉकी इंडिया’ने शनिवारी केली.
नवी दिल्ली – पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणा-या दौ-यासाठी भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाची निवड ‘हॉकी इंडिया’ने शनिवारी केली. प्रशिक्षण वजा स्पर्धेसाठीच्या भारताचे नेतृत्व मिडफिल्डर हरजीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. फॉरवर्ड इम्रान खान उपकर्णधार असेल.
१८ सदस्यीय भारताच्या संघात हरजीत आणि इम्रानसह सुल्तान ऑफ जोहोर चषकात खेळलेला बचावपटू हरमनप्रीत सिंग आणि फॉरवर्ड सिमरनजीत सिंगचा समावेश आहे. २ ते १३ डिसेंबर २०१४ या कालावधीतील गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया दौ-यात भारताचे ज्युनियर हॉकीपटू पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. आठव्या पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषकाची (२०१५) तयारी म्हणून भारताच्या या दौ-याकडे पाहिले जात आहे.
भारताचा संघ : गोलकीपर – अभिनव कुमार पांडे, जुगराज सिंग. बचावपटू – वरुण कुमार, हरमनप्रीत सिंग, दिप्सान तुर्की, गुरिंदर सिंग, जरमनप्रीत सिंग, आनंद लाक्रा. मिडफिल्डर – हरजीत सिंग (कर्णधार), इम्रान खान (उपकर्णधार), संता सिंग, मनप्रीत सिंग, सुमीत. फॉरवर्ड – परविंदर सिंग, सिमरनजीत सिंग, सुमित टोप्पो, मनदीप सिंग, अमन कुरेशी.