ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणा-या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारपासून (१४ डिसेंबर) सुरुवात होत आहे.
होबार्ट– ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणा-या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारपासून (१४ डिसेंबर) सुरुवात होत आहे.
यजमानांसह पाहुण्यांसाठीही ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. मायदेशात नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर ०-१ असे पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. श्रीलंकेला घरच्या पाठिराख्यांसमोर न्यूझीलंडविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली. सहावे रॅँकिंग असलेल्या श्रीलंकेला तिस-या रॅँकिंगवर असणा-या ऑस्ट्रेलियाला नमवणे फारसे सोपे नाही. त्यातच यावर्षी श्रीलंकेच्या वाटय़ाला खूप कमी कसोटी सामने आलेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावली असली तरी चुरशीची मालिका पाहता ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेवर वर्चस्व गाजवण्याची संधी आहे. माजी कर्णधार रिकी पॉँटिंगच्या निवृत्तीनंतर यजमान संघाची पहिलीच कसोटी मालिका आहे. पाँटिंगच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघ खऱ्या अर्थाने युवा वाटतो. क्लार्क आणि हसी दोघेच अनुभवी फलंदाज संघात आहेत. नेहमीप्रमाणे श्रीलंकेची भिस्त फलंदाजीवर आहे. कर्णधार माहेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशानमुळे त्यांची फलंदाजी मजबूत वाटते.
होबार्टवर उभय संघांमध्ये यापूर्वी झालेल्या लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने १० सामने खेळताना सात विजय मिळवलेत. यजमानांनी दोन विजय मिळवताना तितकेच पराभव पाहिलेत.
वेळ : शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : ईएसपीएन