वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दंड भरावा लागला.
रांची – रांचीच्या रस्त्यावरुन केलेली बुलेट राईड कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चांगलीच महागात पडली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दंड भरावा लागला. त्याच्या बुलेटवर नंबरप्लेट नसल्याने रांची वाहतूक पोलिसांनी धोनीला ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
विश्वचषकानंतर घरी परतलेल्या धोनीने सोमवारी आपल्या रॉयल एनफिल्ड या बुलेटवरुन तीन तास रांचीच्या रस्त्यावर फेरफटका मारला.यावेळी त्याच्या गाडीवर नंबरप्लेट नव्हती. धोनीच्या बुलेट राईडचा फोटो वर्तमानपत्रात आल्यानंतर पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली.
त्यानंतर मंगळवारी त्याला वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकऱणी मंगळवारी पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला. धोनीने याप्रकरणी चूक कबूल करुन पोलिसांना सहकार्याचे आश्वासन दिले.