भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर भूमी येथील राजीव गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.
नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वीर भूमी येथील राजीव गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्मृतीस्थळावर पुष्प वाहून श्रध्दांजली अपर्ण केली. सोनिया गांधी, राहुल गांधी, कन्या प्रियंका गांधी जावई रॉबट वडेरा सकाळी साडेसहाच्या सुमारास वीर भूमी येथे गेले होते. यावेळी शांती मंत्राचे पठण करण्यात आले. अनेक लहान मुलांनीही स्मृतीस्थळावर पुष्पवाहून श्रध्दांजली अपर्ण केली.
भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टि्वटरवरुन राजीव गांधींना श्रध्दांजली वाहिली. ३१ ऑक्टोंबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ या काळात राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते.