जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नावगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नावगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला.
नावगाम सेक्टरमध्ये मंगळवारी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या मतदानादरम्यान घातपात घडवण्याच्या इऱाद्याने सीमेपलीकडून या दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. मात्र सर्तक असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. भारतीय जवानांनी मंगळवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात आणखी तीन दहशतवादी ठार झाले असून सैन्याच्या एका कनिष्ठ अधिका-याचा मृतदेह सापडला आहे. यामुळे मृतांचा आकडा सात वर पोहचला आहे.
चकमकीनंतर राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत सहा दहशतवादी ठार झाल्याचे आढळले. तर या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. अद्यापही या भागात शोधमोहिम सुरु आहे.
मागच्या आठवड्यात २७ नोव्हेंबर रोजी अर्निया येथे भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले होते. या चकमकीत तीन जवानांसह १२ जणांचा मृत्यू झाला.
[EPSB]
कुपवाडयात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नावगॉन सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी सुरक्षारक्षकां बरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.
[/EPSB]