नैसर्गिक आपत्तीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिर रविवारपासून पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले.
डेहराडून- नैसर्गिक आपत्तीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिर रविवारपासून पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले.
रविवारी सकाळी आठ वाजता मंदिरात झालेल्या आरतीने भगवान केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. एक वर्षभरापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे केदारनाथ मंदिरासह उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मंदिर परिसरात बर्फाचे थर साचलेले आहेत. मात्र तरीही प्रशासनाने रस्ते बनवले आहेत.
यात्रेकरूंची सुरक्षा आणि चार धाम यात्रेपूर्वी सर्व सुविधांची पुनर्रचना करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने चोख व्यवस्था केली आहे. नागरिकांची सुरक्षा ही सर्वांत महत्त्वाची असून, त्यासाठी सर्व उपाययोजना केली आहे. मात्र तरीही लोकांना निसर्ग तांडवाची भीती असल्याने यात्रेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे येथील पोलिसांनी सांगितले.