कॉँग्रेस कार्यकारिणीची सोमवारी बैठक होणार असून यात पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.
नवी दिल्ली- कॉँग्रेस कार्यकारिणीची सोमवारी बैठक होणार असून यात पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.
कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निवडणुकीनंतर देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. अनेक कॅबिनेटमंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला, याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून त्याचीही चर्चा या बैठकीत होणार असल्याचे समजते.
राज्यात मजबूत प्रादेशिक नेता दिल्यास परिस्थितीत फरक पडू शकतो, हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दाखवून दिले आहे. सिंग यांनी अमृतसरमध्ये भाजपचे नेते अरुण जेटली यांचा पराभव केला, असे एका नेत्याने स्पष्ट केले.