Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeरविवार विशेषकोकणची डबल डेकर नियमित व्हावी ही प्रवाशांची इच्छा!

कोकणची डबल डेकर नियमित व्हावी ही प्रवाशांची इच्छा!

केवळ प्रवासच नव्हे तर हिरव्यागार कोकणातून.. डोंगरांच्या कुशीमधून दिमाखात डौलत जाणारी लाल-पिवळय़ा रंगछटेतील डबल डेकर रेल्वे गाडी जणू पर्यटन सफर घडवणारी गाडी ठरली आहे. संपूर्ण वातानुकूलित आणि दोन मजल्यांची असलेली ही गाडी प्रवासी-पर्यटकांच्या आकर्षणाच्या विषयासह कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाडयांच्या गर्दीवर ‘सोल्युशन’ काढणारीही ठरली आहे.

DOUBLE DECKER Railwayरत्नागिरी – गेल्या मे महिन्यात मुंबई-गोवा मार्गावर चाचणी दौड यशस्वी झाल्यानंतर आधी गणेशोत्सवात ती प्रीमियम पद्धतीने आणि आता हॉलिडे स्पेशल म्हणून ती कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे. प्रीमियम दर पद्धतीमुळे अवाच्या सव्वा तिकीट आकारणीमुळे गणेशोत्सवात ही गाडी जवळपास रिकामीची धावली मात्र, आता तिची लोकप्रियता वाढू लागली असून आठ डब्यांच्या या गाडीची तिकिटे प्रतीक्षा यादीवर विकली जाऊ लागली आहेत.

१६ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत डबल डेकर गाडी मुंबईतील लो. टिळक टर्मिनस ते करमळी (गोवा) अशी कोकण रेल्वे मार्गावर हॉलिड स्पेशल म्हणून धावत आहे. दादर ते मडगाव मार्गावर धावणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या पाठोपाठ जवळपास अर्ध्या तासाच्या अंतराने ही गाडी धावते. पहाटेच्या सुमारास मुंबईतून निघून सकाळी खेड, चिपळूणला दुपारी रत्नागिरी आणि दुपारनंतर कणकवली, कुडाळला पोहोचण्यासाठी ही गाडी कोकणवासीयांना फायदेशीर ठरली आहे. मांडवी, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी मडगाव पॅसेंजर या गाडयांमध्ये पाय ठेवायलाही जाग नाही, अशी स्थिती असल्याने दारं-खिडक्यांना लटकून आणि प्रसंगी टॉयलेटमधून प्रवास करावा लागलेल्या कोकणवासीय प्रवाशांना ती वरदान ठरली आहे.

संपूर्ण वातानुकूलित असल्याने आणि त्यातही ती डबल डेकर असल्याने सुरू होण्याच्या आधीपासूनच या गाडीची बरीच चर्चा झाली. गेल्या १६ ऑक्टोबरपासून १२ नोव्हेंबर या कालावधीसाठी ही गाडी एलटीटी-करमळी (गोवा) तसेच करमळी-एलटीटी मार्गावर दिवसआड धावते आहे. दोनपैकी प्रत्येक दिशेने दिवसआड असली तरी कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी दररोज धावत आहे. कोकणात पहिल्यांदाच धावणारी ही स्वप्नवत गाडी आपल्या कॅमे-यात टिपण्यासाठी अजूनही गाडीच्या मार्गावरील विविध स्थानकांत रेल्वेप्रेमी पर्यटक, हौशी छायाचित्रकार हजेरी लावताना दिसत आहेत.

सध्या ही गाडी विशेष गाडी म्हणून धावत आहे. तिचा प्रतिसाद पाहून ती याच मार्गावर कायम करण्याची भूमिका मध्य रेल्वेकडून या पूर्वीच स्पष्ट करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरपासून या गाडीच्या विशेष फे-यांना लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेता ती कायम होईल, अशीच स्थिती सध्या तरी आहे.

डबल डेकरचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थीविम

एलटीटी-करमळी (गोवा) डबल डेकरच्या फे-या

१६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३०, ऑक्टोबर
तसेच १, ३, ५, ७, ९, ११ नोव्हेंबर

करमळी (गोवा)-एलटीटी डबल डेकरच्या फे-या

१७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१ ऑक्टोबर
तसेच २, ४, ६, ८,१०, १२ नोव्हेंबर

कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेल्या विशेष डबल डेकरने प्रवास केलेल्या विविध वयोगटातील अनेक प्रवाशांशी ‘प्रहार’च्या प्रतिनिधीने याच गाडीतून प्रवास करून प्रत्यक्ष संवाद साधला. त्या वेळी बहुतांश प्रवाशांनी डबल डेकरचा प्रवास अत्यंत आरामदायी असल्याचे सांगत ही गाडी याच मार्गावर लवकरच कायमस्वरूपी सोडावी, अशी मागणी केली. ‘प्रहार’ने ऑनबोर्ड ज्या काही प्रवाशांशी संवाद साधला त्यातील निवड प्रतिक्रिया.

प्रवास आरामदायी, लवकर कायम व्हावी

कोकण रेल्वे मार्गावर हॉलिडे स्पेशल म्हणून धावत असलेल्या डबल डेकरचा प्रवास अत्यंत आरामदायी असा आहे. कणकवली-ठाणे प्रवासासाठी आरक्षण खिडकीवर आरक्षणासाठी गेलो तेव्हा मी मागितलेल्या गाडीची तिकिटे शिल्लक नसल्याने बुकिंग क्लर्कने मला डबल डेकरला आसने शिल्लक असल्याचे सांगितले आणि मी लगेच या गाडीचे बुकिंग केले. गाडीतील वातानुकूलन यंत्रणा चांगली असून प्रवास आरामदायी आहे. ही गाडी लवकर कायस्वरूपी सोडावी म्हणजे इतर गाडयांवरील भार कमी होईल. गाडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी तिचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. असे झाले तर डबल डेकरचे एकही आसन खाली जाणार नाही.- डॉ. विठ्ठल इंगवले, प्रिंसिपल, शैलेंद्र कॉलेज, दहिसर, मुंबई

सावंतवाडीला थांबा आहे, पण आरक्षण सुविधा नाही

डबल डेकरचे २९ ऑक्टोबरचे तिकीट आरक्षित करण्यासाठी सावंतवाडीहून कुडाळला जावे लागले. सावंतवाडी येथे रेल्वेची संगणकीकृत आरक्षण सेवा (पीआरएस) नाही. त्यामुळे डबल डेकरला नुसता सावंतवाडी येथे थांबा देणे पुरेसे नाही. गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळण्यासाठी जेथे थांबा आहे, तेथे तिच्या आरक्षणाची सुविधा मिळायला हवी. ऑनलाइन आरक्षण करणे सर्वाच्याच सोईचे आहे, असे नाही.- श्री. आनंद पालये, सावंतवाडी

‘गाडी कंटीन्यू होनी चाहिए’

कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या पहिल्या-वहिल्या वातानुकूलित दुमजली गाडीबाबत कोकणवासीय प्रवाशांबरोबरच या गाडीत सेवा बजावलेल्या रेल्वे कर्मचा-यांनीही गाडीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सध्या गाडीला लाभत असलेला प्रतिसाद पाहून ‘डबल डेकर इस रूटपर कंटीन्यू होना चाहिए’.- एच. के. मिणा, टी. टी. ई., मध्य रेल्वे

करमळीऐवजी मडगावपर्यंत न्यावी

संपूर्ण वातानुकूलित असून गोवा-मुंबई प्रवासासाठी डबल डेकर गाडीचे तिकीट रिझनेबल आहे. याच मार्गावर ही गाडी कायम व्हायला हवी. करमळीऐवजी ती मडगावपर्यंत नेल्यास आणखी सोईचे होईल. करमळी स्थानकापासून मी ठाण्यापर्यंत प्रवासाचे तिकीट काढले आहे. गाडी सुटतानाच जेवण-नाश्त्याचे रॅपर्स गाडीत पडलेले पाहिले आणि खटकले. वातानुकूलित आणि स्वच्छ, टापटीप गाडीत असा कचरा अपेक्षित नाही. गाडी सुटताना तरी किमान साफसफाई झालेली असायलाच हवी. या बाबींकडे रेल्वेने लक्ष दिले की बाकी प्रवास एकदम झक्कास आहे.- सुंदरेश, करमळी, गोवा

पांढरा हत्ती कामसू बनतोय!

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात प्रथमच वातानुकूलित दुमजली गाडी धावली. पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावर धावल्याने या गाडीबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असूनही प्रीमियम दर आकारणीमुळे तिकिटाची रक्कम पाहूनच प्रवाशांनी गणेशोत्सवात तिच्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे गणेशोत्सवात डबल डेकर रेल्वेसाठी उत्पन्न मिळवून देणा-या गाडीऐवजी ‘पांढरा हत्ती’ ठरली होती. आता मात्र ही परिस्थिती बदलली असून हाच पांढरा हत्ती आता कामसू बनत चालला आहे. त्याचप्रमाणे डबल डेकरला रोहा, कुडाळ, सावंतवाडी आणि थीविम असे आणखीन थांबे दिल्याने तिचा पूर्वीचा सुपरफास्ट दर्जा काढून ती नियमित एक्स्प्रेस झाली. साहजिकच या गाडीचे तिकीटही प्रवाशांच्या आवाक्यात आले आहे.

दिवाळीसाठी या मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष डबल डेकर गाडी (०२००५/६) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ ऑक्टोबरपासून १२ नोव्हेंबर या कालावधीसाठी ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे. मुंबईतील लो. टिळक टर्मिनस स्थानकातून ही गाडी पहाटे ५.३० वा. सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.३० वा. ती करमळीला पोहोचते. या गाडीचा परतीचा प्रवास गोव्यातील करमळी स्थानकातून दुस-या दिवशी सकाळी ६ वा. सुरू होऊन आणि त्याच दिवशी सायं. ५.४० वाजता पोहोचेल. १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेने बिगर पावसाळी वेळापत्रक जाहीर केल्याने डबल डेकरचा या मार्गावरील प्रवास जवळपास एक तासाने आधी संपणार आहे.

प्रीमियम तिकीट दर रद्द केल्याने व या गाडीचे तिकीट दर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चेअरकार तिकिटापेक्षाही कमी असल्याने या गाडीला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. या आधीही ऑक्टोबरच्या सुरुवातीला या गाडीच्या २ तसेच ५ आक्टोबर रोजी दोन फे-या कोकण रेल्वे मार्गावर झाल्या. त्यासाठी आरक्षण सुरू होताच झपाटय़ाने तिकीट विक्री झाल्याने या दोन्ही फे-यांसाठी प्रतीक्षा यादीवरही तिकिटे विकली गेली. अशीच स्थिती १६ ऑक्टोबरपासून पुन्हा धावणा-या धावणा-या गाडीच्या फे-यांबाबत झाली. १६ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या डबल डेकरच्या फे-यांपैकी २२, २४, २६, २८, ३० ऑक्टोबरची डबल डेकर हाउसफूल धावली. १ नोव्हेंबर गाडीही तात्काळ कोटय़ातील तिकिटे वगळली तर जवळपास हाउसफूलच धावली. दरम्यान, यापुढच्या या गाडीच्या उर्वरित तारखांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाडीच्या करमळी-एलटीटी या अप दिशेच्या दि. २५ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबपर्यंतच्या फे-यांसाठी रेल्वेला प्रतीक्षा यादीवर तिकिटे विकावी लागली आहेत. त्यापुढील ४, ६ आणि ८ नोव्हेंबच्या फेरीसाठी अशी स्थिती असेल असे सध्याच्या आरक्षण स्थितीवरून दिसते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट