कोकण रेल्वे मार्ग हा आतापर्यंत हमखास नफा कमवून देणारा मार्ग ठरला आहे. त्यामुळे या मार्गावर मालगाडय़ा धावतात तसेच दक्षिणेपर्यंत जाणा-या प्रवासी गाडय़ाही धावतात. यात कोकण आणि गोवा राज्य हे भाग कोकण रेल्वेला हमखास नफा कमवून देणारे ठरले आहेत. मात्र, रेल्वेने कोकण रेल्वेच्या मार्गावर डबल डेकर आणि शताब्दी अशा दोन गाडय़ा सुरू करताना व्यावसायिकतेला आणि कल्पकतेला सोडचिठ्ठी दिली आहे. गणेशोत्सव तसेच त्या पाठोपाठ येणारे सण-उत्सव लक्षात घेऊन या गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र, डबल डेकर आणि शताब्दीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने या दोन्ही गाडय़ा रद्द करण्याचा विचार कोकण रेल्वे करत आहे. या गाडय़ा सुरू करण्याच्या बाबतीत दाखवलेल्या उतावळेपणामुळे दोन चुकीच्या गोष्टी घडल्या. या गाडय़ा सुरू करण्याआधी त्यांना प्रतिसाद मिळू शकेल की नाही, याचा अंदाज घ्यायला हवा होता. या दोन्ही गाडय़ांचे तिकिटांचे दर सामान्य क्लासच्या तिकिटांपेक्षा जवळजवळ दसपट आहे. मुंबई ते मडगाव या मार्गावर स्लीपर कोचच्या तिकिटाचा दर ४०० रुपये आहे; परंतु या दोन श्रीमंती गाडय़ांमध्ये याच प्रवासासाठी साडेतीन ते चार हजार रुपये द्यावे लागतात. या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांची कुवत काय आहे, अन्य गाडय़ातल्या अशा महागडय़ा डब्यांमध्ये कितपत गर्दी असते आणि ही गर्दी या दोन गाडय़ा भरून होईल की नाही, याचा अंदाज घ्यायला हवा होता. परंतु तिकिटांचे दर जास्त असल्याने प्रवाशांनी या गाडय़ांकडे दुर्लक्ष केले. मुंबईवरून गोव्याला जाणा-या पर्यटकांकडे मोठ्या रकमेची तिकिटे काढून प्रवास करण्याची ऐपत असू शकते. परंतु गोव्याकडे जाणा-या अशा पर्यटकांनाही याची पुरेशी कल्पना नव्हती. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही. अन्यही अनेक गाडय़ांच्या बाबतीत हा प्रकार घडतो. प्रवाशांना फारशी कल्पना न देता कोठे तरी नवी गाडी सुरू केली जाते, पण प्रवाशांना कल्पना नसल्याने ते त्या गाडीचा वापर करत नाहीत. परिणामी गाडीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, असा शेरा रेल्वे बोर्ड मारते आणि ती गाडी बंद करून टाकते. असाच प्रकार याही बाबतीत झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, घाईगर्दीत या दोन गाडय़ा सुरू केल्या गेल्या. त्याच्या आधी या गाडय़ांची पुरेशी जाहिरात करण्यात आली नव्हती. आता गाडय़ा अडचणीत आल्या आहेत आणि आता जाहिरात सुरू झाली आहे. ‘वरातीमागून घोडे’ असा हा प्रकार झाला आहे; परंतु रेल्वे खात्यातल्या या व्यावसायिकतेच्या अभावामुळे रेल्वेचेही नुकसान झाले. रेल्वे खात्याने या गाडय़ा रद्द करण्याची घाई करू नये. खात्याच्याच चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. आता सुरुवातीला गाडय़ा तोटय़ात असल्या तरी अजून काही दिवस त्या चालवाव्यात आणि तिकिटांचे दर अजून थोडे कमी करता येतील का, याचा विचार करून थोडेसे नियोजन करून या दोन गाडय़ा सुरू ठेवाव्यात.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on